
अमरावती : स्वार्थाच्या राजकारणासाठी जाती-जातीत धर्मा-धर्मात (Religion) वादाची चुल मांडलेली आपल्याला अनेकदा दिसते. त्यावर राजकीय पोळी शेकण्याची प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी अमरावतीत हिंदू-मुस्लिममध्ये (Hindu Muslim Dispute) तेढ निर्माण करण्याचे काम कथित धर्माच्या ठेकेदारानी केलं.एवढेच काय तर तीन दिवसांपूर्वी परतवाडा मध्ये काश्मीर फाईल्स (Kashmir Files) वरून हिंदू मुस्लिम तरूनात राडा झाला. असं सगळं असलं तरी याचं परतवाडा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मेळघाटच्या सेमाडोहमध्ये एक अनोखी एकदा दिसून आलीय. इथल्या सेमलकर या हिंदू कुटूंबाने सातशे पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी घराचे छत उपलब्ध करून देत हिंदू-मुस्लिम सलोख्याचे उदाहरण समाजासमोर ठेवले. त्यामुळे कुणी कितीही काहीही प्रयत्न केले तरी माणसातलं माणूसपण अजून जिवंत अशा काही माणसांमुळे राहिलंय.
अमरावती जिल्ह्यातील तबलीकी जमातीच्या मुस्लिम बांधवांचा मेळघाट मधील धारणी मधील कळमखार मार्गावरील दारुल उरूम येथे दिवसभर “मशवरा” होता. या मशवरा साठी अमरावती मधील जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुस्लिमबांधव धारणी मध्ये आले होते. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन हे केले जाते. मशवरा कार्यक्रम आटोपल्या नंतर परततीच्या प्रवासावेळी सायंकाळची नमाज अदा करण्याची वेळ झाली होती.पण धारणी-परतवाडा मार्गावर असलेल्या मेळघाटचे घनदाट जंगल आहे.त्यात वन्यजीवांचा वावर असल्याने त्यामुळे मधे कुठे नमाज करणे शक्य नव्हते. त्यामुळे हे सर्व मुस्लिम बांधव सेमडोह मध्ये थांबले होते.
दरम्यान रस्त्यावर उभे असलेले प्रदीप सेमलकर यांना काही तबललिगीनी मुस्लीम बांधवांनी नमाज पठन करण्यासाठी जागा देता का? ही विचारणा केली. प्रदीप सेमलकर यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांनी नमाज पठण करण्यासाठी घराचे छताची जागा उपलब्ध करून दिली. यावेळी मुस्लिम बांधवानी सेमलकर यांचे आभारही मानले. आपल्यात अनेकदा हिंदू-मुस्लिम वादाचे राजकारण पेटतं. हा संघर्ष कधी कधी वयक्ततीक फायद्यासाठी एवढा वाढवला जातो की अनेकदा हिंसाचरा होतो. मात्र त्याचवेळी दुसरीकडे असे आदर्श उदाहणही दिसून येत. त्यावेळी समजत माणासातली आपुलकी अजूनही बाकी आहे. या गोष्टी अशाच जपण्याची एकमेकांना आधार देत पुढे जाण्याची नितांत गरज आहे.
परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांचा तपास CBI कडे जाणार! खासदार Sanjay Raut म्हणतात…