AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी गूडन्यूज, राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे.

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी गूडन्यूज, राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी
लवकरच मोठी नोकरभरती निघणारImage Credit source: TV9
| Updated on: Mar 24, 2022 | 7:09 PM
Share

मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी (MPSC Exam) मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती (Job) होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे. यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी आयोगाला राज्य सरकारने (Government Job) तसं मागणीपत्र दिलंय. कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी आणि बरोजगार तरुण, तरुणींसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज आहे. येत्या काही दिवसातच त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.  त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थीही आता परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.

मोठ्या संख्येने पदं रिक्त

राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी केला होता. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्याच धर्तीवर आता राज्याने तातडीने पाऊलं उचलायला सुरूवात केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय कोरनामुळे देशोधडीला लागले आहेत. असातच नोकरभरती रखडल्याने अनेकांसमोर रोजगाराचा सवाल उपस्थित झाला आहे. लवकरात लवकर नोकरभरती झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे जीवन पुन्हा उजळू शकते. त्यामुळे शासनही जोमाने कामाला लागले आहे.

Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

Devendra Fadnavis: मुंबईला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही, फडणवीसांचा आकडेवारीसह ठाकरेंना सवाल, पिंपरी चिंचवड, नागपूर, पुण्याचा दाखला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.