AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय
मुख्यमंत्र्यांची घरांबाबत मोठी घोषणाImage Credit source: Vidhansabha
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 6:27 PM
Share

मुंबई : आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कारण आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla)  मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. मुंबईत अनेकजण येतात कष्ट करतात, मात्र सध्याकाळी पाठ टेकायला घर नसतं, हाच विचार करून मुंबईकरांसाठी काही मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहेत.

भाजपने सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून पाहिलं

मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार फक्त माझ्या सरकारने केला. आधीही मुंबईचा विचार केला. मात्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, असे म्हणत विरोधकांना टोले लगावले आहेत. मुंबईतल्या कष्टकरी लोकांसाठी आम्ही लढतोय याचा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रच्या ज्या जागा मुंबईत आहेत, याचाही पाठपुरावा करून हे पूर्ण करण्यात येईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. काही योजना जाहीर केल्या मात्र काही योजनांचा विचार केला नव्हता, धारावीचा विकास होऊ शकला नाही कारण जमीन हस्तांतरण बाकी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी

बीडीडी चाळी संदर्भात झिम्मा फुगडी चालू होत, पण प्रत्यक्षात कामाला आम्ही सुरूवात केली. निवडणुकीच्या वेळेला घोषणा केल्या होत्या त्या महाविकास आघाडीचं सरकार बोलणार नाही करून दाखवणार आहे. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नव्हता, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखले आहे. मुंबईत घर घेणं हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं मात्र अनेकांना घरांची अव्वाच्या सव्वा दर पाहता सहज घर घेणं शक्य होत नाही. मात्र या योजांनी आमदारांबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांनाही काहीतही हातभार लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Video: आमदारांना घरं देणार! Uddhav Thackeray यांची घोषणा, पण घोषणेनंतर खळखळून का हसले ठाकरे?

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

Devendra Fadnavis: मुंबईला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही, फडणवीसांचा आकडेवारीसह ठाकरेंना सवाल, पिंपरी चिंचवड, नागपूर, पुण्याचा दाखला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.