Bachchu Kadu : …अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचा निर्णय शेवटच्या 5 मिनिटांत घेऊ, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

सरकार बनविताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या या आमदारांकडे अडीच वर्ष दुर्लक्ष करण्यात आले. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही, असा सूर या पक्षांतून उमटत आहे. बच्चू कडूदेखील त्याचाच एक भाग आहेत. त्यादृष्टीने त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

Bachchu Kadu : ...अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचा निर्णय शेवटच्या 5 मिनिटांत घेऊ, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा
बच्चू कडू (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jun 06, 2022 | 2:26 PM

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) सहाव्या जागेवरून रिंगणात उतरलेल्या संजय पवार यांना विजयी करण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यात शिवसेनेला नाकीनऊ येत असतानाच आता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ऐनवेळी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. बच्चू कडू हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडी काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल. राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल ही दोन मते त्यांच्याकडे आहेत.

बच्चू कडू नाराज?

सरकार बनविताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या या आमदारांकडे अडीच वर्ष दुर्लक्ष करण्यात आले. राज्यात केवळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच सत्ता असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही, असा सूर या पक्षांतून उमटत आहे. बच्चू कडूदेखील त्याचाच एक भाग आहेत. त्यांनी जरी महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा केला असला तरी त्यांच्याच म्हणण्यानुसार शेवटच्या पाच मिनिटांत काय होते, यावर सर्व अवलंबून असणार आहे.

वातावरण तापले

राज्यसभा निवडणूक, सहावा उमेदवार यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात बच्चू कडू यांच्या वक्तव्यालाही महत्त्व आले आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मते आहेत असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने वेगळेच गणित मांडून आपण विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्याकडे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठीची पुरेशी मते नाहीत. अपक्षांची मदत त्यांना घ्यावीच लागणार आहे. तरच राज्यसभेवर कुणाचा तरी उमेदवार निवडून जाईल, अशी शक्यता आहे.

अपक्षांना आला भाव

राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. ते मतदान करू शकतील की नाही, याविषयी संभ्रम आहे. एमआयएमनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. विधानसभेत काही छोट्या पक्षांचे मिळून 16 आमदार आहेत. तर 13 अपक्ष आमदार आहेत. म्हणजे एकूण 29 आमदार राज्यसभेवर कुणाला पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे.

29 मते कोणती?

– बहुजन विकास आघाडी : 3

– एमआयएम : 2

– प्रहार जनशक्ती पक्ष : 2

– समाजवादी पार्टी : 2

– मनसे : 1

– राष्ट्रीय समाज पक्ष : 1

– क्रांतीकारी शेतकरी पक्ष : 1

– जनसुराज्य शक्ती : 1

– शेतकरी कामगार पक्ष : 1

हे सुद्धा वाचा

– कम्युनिस्ट पक्ष : 1

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें