Amravati accident | लग्न ठरलं, खरेदीसाठी नागपूरला आला; अमरावतीकडं परतताना अपघात, सुखी संसाराचं स्वप्न अपूर्णचं!

| Updated on: May 13, 2022 | 3:20 PM

सागरचं लग्न 18 मे रोजी नागपुरात होणार होतं. लग्नाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी तो नागपूरलाच आला होता. आनंदानं खरेदी केली. हवे असलेले कपडे खरेदी केले. पण, परतत असताना दुचाकी अनियंत्रीत झाल्यानं अपघात झाला. त्यात सागरचा मृत्यू झाला.

Amravati accident | लग्न ठरलं, खरेदीसाठी नागपूरला आला; अमरावतीकडं परतताना अपघात, सुखी संसाराचं स्वप्न अपूर्णचं!
अमरावती - अपघातात ठार झालेला सागर गिरी, वरुडचे ग्रामीण रुग्णालय.
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : सागर गिरी हा 28 वर्षीय तरुण. मूळचा अमरावती जिल्ह्यातील वरुड (Varud in Amravati district) तालुक्यातील मागरुळीपेठचा रहिवासी. वयात आल्यानं लग्न ठरलं. सहा दिवसानंतर म्हणजे 18 मे रोजी नागपूर येथे विवाह होणार होता. त्यासाठी लग्नाची खरेदी करायला तो नागपूरला आला. खरेदी केली. आता धुमधडाक्यात लग्न करायचंय म्हणून सुखी संसाराची स्वप्न पाहत तो परतत होता. दुचाकीनं मित्रासोबत नागपूरवरून अमरावतीकडं परत येत होता. पण, काळाला काहीतरी वेगळंच हवं होतं. मित्रासोबत परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. सागर गिरीची ( Sagar Giri) गाडी अनियंत्रीत झाली. वरूडजवळ हा अपघात झाला. त्यामुळं दुचाकीवरून दोन्ही जखमींना वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात (In rural hospital at Varud) दाखल करण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. तिथं रात्री सागर गिरीचा मृत्यू झाला.

सहा दिवसांनंतर लग्न

सागरचं लग्न 18 मे रोजी नागपुरात होणार होतं. लग्नाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी तो नागपूरलाच आला होता. आनंदानं खरेदी केली. हवे असलेले कपडे खरेदी केले. पण, परतत असताना दुचाकी अनियंत्रीत झाल्यानं अपघात झाला. त्यात सागरचा मृत्यू झाला. सुखी संसाराची स्पप्न रंगवित असताना सागरला हे जग सोडावं लागलं. यामुळं गिरी कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे.

दुचाकीवरील नियंत्रण सुटले

सागरनं दिवसभर खरेदी केली. दुचाकीनं तो आला होता. त्यामुळं थकला होता. गाडीनं परत जात असताना दुचाकी अनियंत्रीत झाली. त्यामुळं त्याचा अपघात झाला. वरुड येथील रुग्णालयात त्याला सुरुवातीला दाखल करण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्यानं नागपूरच्या मेडिकलमध्ये हलविण्यात आले. पण, तिथं पोहचूनही शेवटी सागरचा जीव गेला. वधू पक्षाकडील लोकंही रुग्णालयात आले होते.

हे सुद्धा वाचा