Amravati Police : अमरावतीत गांजाची मोठी तस्करी, पोलिसांच्या कारवाईत 435 किलो गांजा जप्त, 4 आरोपींना अटक

| Updated on: Sep 03, 2022 | 4:17 PM

आंध्र प्रदेशातून अमरावतीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सापडा रचला. यात पोलिसांनी यात चार आरोपींना अटक केली.

Amravati Police : अमरावतीत गांजाची मोठी तस्करी, पोलिसांच्या कारवाईत 435 किलो गांजा जप्त, 4 आरोपींना अटक
अमरावतीत गांजाची मोठी तस्करी, पोलिसांच्या कारवाईत 435 किलो गांजा जप्त
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झालं आहे. नुकताच पोलिसांच्या कारवाईत तब्बल 435 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमधून अमरावतीत गांजाची मोठी वाहतूक (Traffic) होत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Economic Offenses Branch) मिळताच त्यांनी सापडा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात 4 आरोपींसह 74 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर पोलीस स्टेशनच्या (Chandur Police Station) ताब्यात देण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी करीत आहेत.

अशी आहेत आरोपींची नावे

आंध्र प्रदेशातून अमरावतीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सापडा रचला. यात पोलिसांनी यात चार आरोपींना अटक केली. ऋषभ पोहोकार (25, रा. रिद्धपूर, मोर्शी), विक्‍की युवनाते (20, रा. शिरजगाव कसबा, चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास (19, आझादनगर, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतिफ (19, रतनगंज, अमरावती), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्‍या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्‍हे यांच्‍या नेतृत्‍वात पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाने, रवींद्र बावने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, मूलचंद भांबूरकर, मोहन मोरे, अमोल देशमुख, विलास रोकडे, नीलेश डांगोरे, नितीन कळमकर, प्रमोद शिरसाट यांनी ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा