Amitabh Bachchan : मला नाही माहिती मी असं काय केलंय ज्यामुळे…., अभिताभ बच्चन का झाले इतके भावुक? Video व्हायरल
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

Amitabh Bachchan : एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी संपत्ती कोणती असते तर ती म्हणजे, त्याचे चाहते… असंच काही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीच देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत… पैसा, प्रसिद्धी आणि संपत्तीसोबतच त्यांनी असंख्य चाहत्यांच्या मनावर देखील विजय मिळवला आहे… आज अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भरतातच नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम त्यांचे विचार आणि भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.
दर रविवारी, अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची गर्दी त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर, जलसा येथे जमते. या काळात बिग बी कधीही त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाहीत. ते त्यांच्या चाहत्यांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात आणि कधीकधी त्यांना भेटवस्तू देखील देतात. आता देखील हेच क्षण बिग बी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
T 5593 – 🙏🙏 pic.twitter.com/3sIA3JWL80
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 12, 2025
बिग बींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये मनातील भावना मांडल्या आहे… इतक्या वर्षांनंतरही, प्रेमाचा हा वर्षाव एक आशीर्वाद आहे हे, त्यांनी कबूल केलं. हे सर्व पाहून ते स्वतः भावुक होतात. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, हजारो लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.
बिग बी म्हणतात, मला नाही माहिती मी असं काय केलंय ज्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे…. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये मनाला स्पर्श करणारं वास्तव सांगितलं आहे. ‘स्पष्ट विचार सर्वात महत्वाचे आहे… ज्यामुळे आपल्याला आपल्या निर्णयाबद्दल माहिती असतं… नाही तर दुसऱ्यांनी दिलेले सल्ले आपल्या विचारांना अंधूक करतात…’ असे विचार बिग बी कायम मांडत असतात आणि ते अनेकांना खरे देखील वाटतात. म्हणून आजही अमिताभ बच्चन यांचे ब्लॉग वाचणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
