Navnit Rana : खासदार नवनीत राणांनी बनविले बाप्पासाठी पुरणाचे मोदक, राणा दाम्पत्याच्या घरी गणरायाचे आगमन

मुली आणि सुनांना खूप काही सांगायची गरज नसते. त्या पाहत पाहत शिकतात, अशी आपली संस्कृती आहे. मुंबईत माहेरी असताना फक्त खात होती. पण, सासुरवाडीत आल्यानंतर सासू करते.

Navnit Rana : खासदार नवनीत राणांनी बनविले बाप्पासाठी पुरणाचे मोदक, राणा दाम्पत्याच्या घरी गणरायाचे आगमन
खासदार नवनीत राणांनी बनविले बाप्पासाठी पुरणाचे मोदक
| Edited By: | Updated on: Aug 31, 2022 | 4:35 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरी ढोलताश्याच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. राणा दाम्पत्याच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी बाप्पासाठी मोदक (Modak) बनिवले. सासूबाईनी मला मोदक बनविणं शिकविलं, अस नवनीत राणा यांनी सांगितलं. नवनीत राणा म्हणाल्या, कोविड पॉझिटिव्ह (Covid positive) असताना पहिल्यांना मोदक बनविले होते. मोदक बनविण्याचे व्हिडीओ टाकल्यानंतर तुमच्या हातचे मोदक कोण खाणार, असं नेटकरी म्हणत होते. कारण तेव्हा मी कोविड पॉझिटिव्ह होते. मुंबईत असताना बाप्पाला मोदक बनवून भोग लावला होता.

स्वतःच्या हाताने तयार केले मोदक

मुली आणि सुनांना खूप काही सांगायची गरज नसते. त्या पाहत पाहत शिकतात, अशी आपली संस्कृती आहे. मुंबईत माहेरी असताना फक्त खात होती. पण, सासुरवाडीत आल्यानंतर सासू करते. मग आपणही काही वस्तू बनवाव्यात म्हणून ते शिकले. बाप्पाला स्वतःच्या हातानं मोदक बनवून भोग चढविलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

खासदार अनिल बोंडे यांच्याकडेही बाप्पाचं आगमन

दुसरीकडं खासदार अनिल बोंडे यांच्याकडंही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणपत्ती बाप्पा मोरयाचा गरज करत अनिल बोंडे यांनी गणपती बाप्पाला घरी विराजमान केलं. अमृत महोत्सवी तिरंग्याचा देखावा त्यांनी घरी निर्माण केला.