Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं, 50 हजारांच्या अनुदानावरून नवनीत राणांचा टोला

| Updated on: Jul 14, 2022 | 3:19 PM

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यावरून आता खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोलेबाजी केली आहे.

Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं, 50 हजारांच्या अनुदानावरून नवनीत राणांचा टोला
संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार, नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
Image Credit source: tv9
Follow us on

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. तोच निर्णयांचा धडका कायम ठेवत आज मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यात पहिला सर्वात मोठा निर्णय म्हणजे पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार आहेत, तर दुसरा मोठा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यावरून आता खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोलेबाजी केली आहे.

निर्णयांचं स्वागत, ठाकरे सरकारला टोलेबाजी

काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या निर्णयावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिंदे -फडवणीस सरकारचे सरकारचे अभिनंदन केले आहे, तसेच जनतेच्या हिताचे हे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्य माणसाला दिल्याचा मिळाला आहे, तसेच आता सरकारने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला आहे. आता थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे, यावरही नवनीत राणा यांनी सरकारचे आभार मानले, तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना 50 हजार रुपयेचा अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला, यावर बोलताना, सरकार मागच्या सरकारला ते जमल नाही ते या सरकारने केले असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लागवला आहे.

नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच विधानसभेच्या अधिवेशनात केलेल्या पहिल्या भाषणामध्येच पेट्रोल डिझेलचे दर कमी करणारा असल्याची घोषणा केली होती. तोच शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहे. ही नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. तसेच शेतकऱ्यांबाबत कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी हे सरकार आग्रही राहील असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, तेच आज पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आगामी काळतही काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.