Video Amravati | येवदा ग्रामसभेत राडा; सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण, नेमकं कारण काय?

उन्हाळा सुरू झाल्याने प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा, असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न जिव्हारी लागल्याने चार आरोपींनी नकुल सोनटक्के यांच्याशी अरेरावी केली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने सोनटक्के यांना जबर मारहाण करण्यात आली. या ग्रामसभेत चांगलाच राडा झाला.

Video Amravati | येवदा ग्रामसभेत राडा; सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण, नेमकं कारण काय?
अमरावतीच्या येवदा ग्रामसभेत राडा झाला. सामाजिक कार्यकर्त्यास पाणीटंचाईच्या प्रश्नावरून मारहाण करण्यात आली.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 12:57 PM

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा (Yevda in Daryapur taluka) ग्रामपंचायत आहे. येवदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नकुल सोनटक्के (Right to Information Activists Nakul Sontakke) यांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. येवदा, वडनेर, गंगाई (Yevda, Wadner, Gangai.) येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही आहे. प्रशासन नागरिकांना अजून किती छळणार आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. उन्हाळा सुरू झाल्याने प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा, असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न जिव्हारी लागल्याने चार आरोपींनी नकुल सोनटक्के यांच्याशी अरेरावी केली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने सोनटक्के यांना जबर मारहाण करण्यात आली. या ग्रामसभेत चांगलाच राडा झाला.

चौघांविरुद्ध येवदा ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी पंचायत समिती दर्यापूरचे माजी उपसभापती पिता-पुत्रासह चौघांविरुद्ध येवदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ

पाणीटंचाईच्या झळा

येवदा गावात पाणीटंचाई आहे. काही भागात पाणी मिळत नाही. असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्याने विचारला. यावर सत्ताधारी चांगलेच बिथरले. या पाणीटंचाईवर प्रशासनाने अद्याप तोडगा का काढला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावरून हा वाद झाला. यामुळं गावात चांगलेच वातावरण तापले आहे. शिवाय ज्यांना पाणी मिळत नाही, असे लोकही यामुळं संतप्त झाले आहेत. महिला पाणीटंचाईच्या प्रश्नावर आक्रमक झाल्या आहेत.

Photo | नेत्रदीपक aeromodelling show ने जिंकली नागपूरकरांची मने, मानकापूर स्टेडियमवर नजरा आकाशात

Nagpur | महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात, जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांचे आवाहन

एरोमॉडेलिंग शोसाठी मानकापूर स्टेडियम सज्ज, आज 5 हजार मुलांच्या उपस्थितीत आकाशात थरार