Amravati Shiv Sena | अमरावतीतील राणांच्या घरासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते धडकले, राणांचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

| Updated on: Apr 23, 2022 | 12:50 PM

भाजपचा पोपट बनून राणा दाम्पत्य नाचत आहेत. भाजपनं हात काढल्यास राणा दाम्पत्य कुठंही राहणार नाही, असंही संतप्त कार्यकर्ते म्हणाले. राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी राणा मुंबईला गेले आहेत. राज्यातील जनतेला त्यांनी वेठीस धरले आहे, असाही आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथे लावला.

Amravati Shiv Sena | अमरावतीतील राणांच्या घरासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते धडकले, राणांचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने
रवी राणा यांच्या अमरावती तसेच मुंबई येथील घरासमोर शिवसैनिकांचे आंदोलन.
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून ठाम आहेत. आमदार रवी राणा यांच्या मुंबईमधील निवासस्थानानंतर आता अमरावतीमधील निवस्थानासमोर शिवसेना व युवा सेनेचे आंदोलन सुरू झालंय. आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. संतप्त शिवसैनिकांनी (Shiv Sena) राणांच्या घरासमोर मांडला ठिय्या मांडला. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. रवी राणांचे कार्यकर्तेही हजर आहेत.

शिवसैनिक म्हणतात, राणा दाम्पत्य रात्री पळून गेले

राणा दाम्पत्य हे अमरावतीच्या शिवसैनिकांच्या धाकानं पळून गेले. अमरावतीत शिवसेना नसल्याचं सांगतात, तर मग रात्री चोरासारखं का पळून गेलेत. हिंमत असेल, तर राणा दाम्पत्यानी आमच्यासमोर यावं. आम्ही त्यांना दाखवितो शिवसेना काय आहे तर, असं शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणाले. अमरावतीत राणा दाम्पत्यानं कोणतंही विकासाचं काम केलं नाही. अपयश लपविण्यासाठी हे सर्व सुरू आहे. भाजपचा पोपट बनून राणा दाम्पत्य नाचत आहेत. भाजपनं हात काढल्यास राणा दाम्पत्य कुठंही राहणार नाही, असंही संतप्त कार्यकर्ते म्हणाले. राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी राणा मुंबईला गेले आहेत. राज्यातील जनतेला त्यांनी वेठीस धरले आहे, असाही आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथे लावला.

मुख्यमंत्रीच बिघडवताहेत कायदा, सुव्यवस्था

शिवसेना सरकारला काम काही करायचं नाही. बिना कामाचा त्यांनी आतापर्यंत पगार घेतला. कुणाला आतमध्ये टाकायचं आहे. कुणाला कोणत्या गुन्ह्यात अडकवायचं आहे, यासाठी मुख्यमंत्री काम करत असल्याचा आरोपही खासदार नवनीत राणा यांनी केलाय. रवी राणा म्हणाले, आमच्या घरापर्यंत गुंडागर्दी केली जात आहे. तरीही मातोश्रीवर जाणार. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी हनुमान चालीसा म्हणणार. मुख्यमंत्री आम्हाला अडवून कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आम्हाला दरवाज्यात रोखलेलं आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण

Sanjay Raut on BJP, Navneet Rana: आय रिपीट… राष्ट्रपती राजवट लावाच; राऊत फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला का मिरच्या झोंबतात?

Navneet Rana : नवनीत राणा यांनी खासदार विकास निधीतला किती निधी खर्च केला? संपूर्ण आकडेवारी