Amravati | अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार, मागितला एकाचा दिला दुसऱ्याचा मृतदेह, घरी अंघोळ करताना पटली ओळख

| Updated on: Jun 04, 2022 | 12:53 PM

43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक हे शवविच्छेदन गृहात पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना मृतदेह ताब्यात मागितला. त्यानंतर नातेवाईकांनी घाईघाईमध्ये शवविच्छेदन गृहातील एक मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेला. अं

Amravati | अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार, मागितला एकाचा दिला दुसऱ्याचा मृतदेह, घरी अंघोळ करताना पटली ओळख
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार, मागितला एकाचा दिला दुसऱ्याचा मृतदेह
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : अमरावती शहरातील (Amravati City) जिल्हा सामान्य रुग्णालय(इर्विन)ात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदन गृहातून दुसऱ्याच अनोळखी मृत व्यक्तीचे पार्थिव नातेवाईकांनी घरी नेला. या प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. खोलापुरी गेट (Kholapuri Gate) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी 43 वर्षीय एका व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये उपचार सुरू होता. परंतु, बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण परिसरात माहिती पडावे, यासाठी तो मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. दरम्यानच गुरुवारी सकाळी गोपालनगर (Gopalnagar) अनोळखी इसमाला राजापेठ पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये दाखल केले. त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे तोही मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता.

घरी गेल्यावर कळले दुसराच मृतदेह

43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक हे शवविच्छेदन गृहात पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना मृतदेह ताब्यात मागितला. त्यानंतर नातेवाईकांनी घाईघाईमध्ये शवविच्छेदन गृहातील एक मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेला. अंत्यविधीच्या तयारीत पार्थिवाची आंघोळ घालण्याची वेळ आली. त्यावेळी दुसऱ्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांची भंबेरीच उडाली. हा मृतदेह आपला नसल्याचे पाहून नातेवाईकांची धावपळ पुन्हा सुरू झाली. त्यांनी खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक पुन्हा घरी गेले.

नेमकं काय घडलं

जिल्हा सामान्य रुग्णालयातून मृतदेह न्यायचा होता. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहातून मृतदेहाची मागणी केली. त्या ठिकाणी आणखी दुसरा एक अनोळखी मृतदेह होता. नातेवाईकांना अनोळखी मृतदेह देण्यात आला. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह आहे असे समजून ते मृतदेह घेऊन घरी निघून गेले. घरी मृतदेहाला अंगोळ घालताना ही बाब लक्षात आली. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह नसून दुसऱ्याच कुणाचातरी आहे. त्यानंतर ते अनोखळी मृतदेह घेऊन पुन्हा रुग्णालयात गेले. त्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह त्यांना देण्यात आला. या प्रकारामुळं नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

हे सुद्धा वाचा