
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विविध क्षेत्रांसोबतच बँकिंग क्षेत्रात देखील सक्रीय असल्याचं पहायला मिळतं, मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमृता फडणवीस यांनी आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अखेर आता आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. अमृता फडणवीस यांनी 23 वर्षांपूर्वी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून ॲक्सिस बँकेमध्ये नोकरीला सुरुवात केली होती, त्यानंतर आता त्यांनी 23 वर्षांनंतर आज वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या 23 वर्षांच्या काळात त्यांनी शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी तसेच इतरही अनेक मोठ्या पदांची जबाबदारी सांभाळली, त्यानंतर त्यांनी आज बँकेंच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
याबाबत अमृता फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ’23 वर्षांपूर्वी मी अॅक्सिस बँकेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले होते. आज मी कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे. या काळात मला शाखा व्यवस्थापनापासून ते कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत आणि ट्रेझरीपासून ते कस्टमर रिलेशन विभागापर्यंतचा अनुभव मिळाला, त्यामुळे ही संस्था माझं कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली आहे’ असं ट्विट त्यांनी यावेळी केलं आहे.
23 years ago, I walked into Axis Bank as a young Management Trainee. Today, I sign off as Senior Vice President, with a heart full of gratitude. With experience spanning branch operations to corporate banking , treasury to customer relations , this institution has been my family,… pic.twitter.com/Mo2171NBi2
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 19, 2026
दरम्यान आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. बँकेतील माझे सर्व सहकारी आणि एमडी, सीईओ अमिताभ चौधरी यांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे, हा सुंदर अध्याय इथे संप आहे, परंतु मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.