मुंबईच्या महापाैरपदाबद्दल अत्यंत मोठी अपडेट, मिसेस फडणवीस बोलल्या स्पष्टच, म्हणाल्या..

राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. आता सर्वांच्या नजरा आहेत त्या म्हणजे मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की कोण होणार. यावर अमृता फडणवीस यांनी मोठे विधान केले.

मुंबईच्या महापाैरपदाबद्दल अत्यंत मोठी अपडेट, मिसेस फडणवीस बोलल्या स्पष्टच, म्हणाल्या..
Amruta Fadnavis
| Updated on: Jan 17, 2026 | 1:13 PM

राज्यातील अनेक महापालिकांवर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, जळगाव, धुळे, नागपूर यासह अनेक महापालिकांवर भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आली. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेवर कायमच शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले. मात्र, जोरदार मुसंडी भाजपाने मुंबई महापालिकेवर मारली आणि थेट सर्वात मोठा पक्ष ठरला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही काहीच फरक पडला नाही. ही मोठी कामगिरी भाजपाची आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भाजपा कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यासोबत जल्लोष केला. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मुंबईचा महापाैर आमचाच होईल आणि तो म्हणजे मराठीच..

आता निकालानंतर स्पष्ट होताना दिसत आहे की, मुंबईचा महापाैर भाजपाचा होईल. मुंबई महापालिकेच्या महापाैरपदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. नुकताच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  त्यांनी मुंबईच्या महापाैरपदाबद्दल मोठे विधान केले. मुंबईचा महापाैर नक्की कोण होणार यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.

Live

Municipal Election 2026

02:12 PM

Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...

01:04 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..

01:45 PM

प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू

12:39 PM

Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

अमृता फडणवीस यांनी म्हटले की, मला आनंद आहे की, लोकांनी प्रगतीचे राजकारण स्वीकारले आहे. जात, प्रांत याप्रकारे लोकांना वेगळं करतात. अशा पार्टींना लोकांनी व्होट आऊट केले. आता एक मोठी जबाबदारी आहे महायुतीकडे. आज सामान्य माणसाचे जीवन सुखद व्हावे. ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी एकच सांगेन की, ते विरोधात असतील, लोकांसाठी आणि लोककल्याणासाठी जी चांगली कामे असतील त्यामध्ये त्यांनी अडथळा आणू नये.

जिथे टोकायचे तिथे ते नक्कीच टोकतील. पण जिथे चांगली कामे सुरू आहेत तिथे बंदी आणायला नको… मुंबईच्या महापाैरपदाबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, हिंदू बंधू किंवा भगिनी यांच्यापैकी एक महापाैर असेल. मुंबईचा महापाैर मराठीही असेल असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.