AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला माफ करा मी…’; 21 व्या मजल्यावरून आयटी अभियंता तरुणीची उडी, पुणे हादरलं

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे, आयटी अभियंता असलेल्या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

'मला माफ करा मी...'; 21 व्या मजल्यावरून आयटी अभियंता तरुणीची उडी, पुणे हादरलं
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 05, 2025 | 11:06 AM
Share

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे, 21 व्या मजल्यावरून उडी घेत आय टी अभियंता असलेल्या एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे, या तरुणीनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्यातून या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं  असावं असा प्राथमिक अंदाज आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ‘सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.’ अशी चिठ्ठी लिहून हिंजवडी मधील अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या आयटी अभियंता असलेल्या तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा कोथंबिरे या 25 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे.

अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली असता लिफ्टने 21 व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरी गेली, त्यानंतर पावने पाचच्या  सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालामध्ये तिच्या काही अवयवांना गंभीर इजा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे .

प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटले आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता, पोलिसांना तिने लिहिलेली एक सुसाइट नोट सापडली आहे , ‘त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.’ असं लिहिलेलं आढळून आलं आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत, तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र तिला आलेल्या नैराश्यातून तिने हे पाउलं उचललं असावं असा अंदाज आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...