पुणे विमानतळावर थरकाप उडवणारी घटना, विमानात 192 प्रवासी, लँडिंग गिअर निकामी, थेट 31000 उंचीवर..
पुण्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाला. पुणे विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफनंतर थेट हा तांत्रिक बिघाड झाला.

पुण्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. इंडिगो विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाला. पुणे विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळतंय. इंडिगोच्या 6E 0623 (VT-IZE) विमानाचे लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत न गेल्याने खळबळ उडाली. विमानाचे लँडिंग गिअर बाहेरच राहिल्याची वैमानिकाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. विमानात प्रवासी आणि क्रूसह एकूण 192 जण होते. घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासनाकडून तातडीने हालचाली केल्या. भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळावर फुल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
लँडिंग गिअरची स्थिती तपासण्यासाठी विमानाने धावपट्टीवरून लो पास घेतला. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकांच्या सुरक्षेत विमान बे क्रमांक 7 वर हलवण्यात आले. विमान सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी फुल इमर्जन्सी मागे घेण्यात आली.
एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. विमानातील 192 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सर्वच प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवाशांना गुवाहाटीला पोहोचवण्यासाठी इंडिगोकडून बंगळुरूहून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, एटीसी आणि इंडिगोच्या समन्वयातून मोठी आपत्कालीन मोहीम यशस्वी केली. साधारणपणे अंदाजे 31000 उंचीवर विमान होते.
लँडिंग गिअरमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, काही काळ गोंधळाची स्थिती बघायला मिळाली. प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. विमानातील फक्त एकच प्रवासी जिवंत वाचला. त्यातच काही दिवसांपूर्वी जयपूरच्या विमानतळावर एका एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यातच आज पुणे विमानतळावर इंडिगोच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.