AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांचा फोन आलेला, अर्णव यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही : अनिल देशमुख

अर्णव गोस्वामी यांना जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

राज्यपालांचा फोन आलेला, अर्णव यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही : अनिल देशमुख
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 09, 2020 | 7:14 PM
Share

मुंबई : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असं त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णव यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णव यांच्याशी बोलू शकतात”, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

“अर्णव गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली (Anil Deshmukh on Arnab Goswami case).

“जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे. जेल प्रशासनाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्णव यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकील प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. पण फोनवर ते बोलू शकतील”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अर्णव यांना मारहाण झाली का? याबाबत बोलता येणार नाही. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप यात इंटरेस्ट घेते”, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला.

अनिल देशमुख यांच्या हस्ते वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांचा आज (9 नोव्हेंबर) सत्कार करण्यात आला. सावंत यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना जीव धोक्यात घालून एका चलकाला पकडलं होतं. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या हस्ते दहा हजार रुपये आणि शाल-श्रीफळ देऊन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोहिया प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लोहिया प्रकरणाबाबत मी माहिती घेतो, असं देशमुख यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर