मोठी बातमी! SIR प्रक्रियेत वगळलेल्या नागरिकांना पुन्हा संधी, Form 6 न भरता करा नोंदणी, महाराष्ट्रासह या सात राज्यांसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Election Commission of India SIR: देशभरातील नागरिकांची नाराजी आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे गेल्या सात दिवसात अनेक मुद्यांवर केंद्रीय निवडणूक आयोग सातत्याने बॅकफूटवर येत असल्याचे दिसून येत आहे. ताठर भूमिका सोडत आयोगाने SIR प्रक्रियेत वगळलेल्या नागरिकांना पुन्हा संधी दिली आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

Registration of name in the final electoral roll: केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा कथित कारभाराविरोधात गेल्या एका महिन्यापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर नागरिकांमध्ये सुद्धा SIR प्रक्रियेवरून मोठी नाराजी आहे. गेल्या सात दिवसांत अनेक मुद्यांवर केंद्रीय निवडणूक आयोग सातत्याने बॅकफूटवर येत असल्याचे दिसून येत आहे. ताठर भूमिका सोडत आयोगाने SIR प्रक्रियेत वगळलेल्या नागरिकांना पुन्हा संधी दिली आहे. Form 6 न भरता नागरिकांना अंतिम मतदार यादीत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?
हे मतदार पुन्हा नाव नोंदणी करू शकतील
महाराष्ट्रासह सात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान गैरहजर, स्थलांतरीत, मयत अथवा दुबार नोंद या कारणांमुळे मतदार यादीमधून ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. अथवा ज्यांचे गणना अर्ज प्राप्त झाले नाहीत. अशा सर्व मतदारांना निवडणूक आयोगाने मोठी संधी दिली आहे. हे मतदार आता अंतिम मतदार यादीत त्यांची नावं नोंदवू शकतील.
Form -6, Form-8 भरण्याची नाही सक्ती
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली होती. त्यांना पुन्हा नाव नोंदणी करता येईल. त्यांना Form -6 आणि Form-8 भरण्याची सक्ती नसले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती या मुदतीपर्यंत पुन्हा ही प्रक्रिया सुरू असेल. यामुळे पूर्वी अर्ज न करू शकलेले आणि एसआयआर प्रक्रियेने पीडित असलेल्या मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कुठे आणि कसा करणार अर्ज?
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, नागालँड, हरियाणा आणि दिल्ली राज्यातील नागरीक निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, नोंदणी अर्ज प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) आणि बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे नोंदवतील. या अर्जासोबत एक जोडपत्र (Annexure) जोडावे लागेल. त्यामध्ये अर्ज का सादर केला नाही, याचे कारण आणि आपण नवीन नोंदणीसाठी फॉर्म 6 भरला नसल्याचे घोषणापत्र सादर करावे लागेल. ज्यांनी स्थलांतर केले आहे. त्यांना पूर्वीचा आणि सध्याचा नवीन पत्ता याची माहिती द्यावी लागेल. त्यांना हल्लीच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा पुरावा द्यावा लागेल.