मण्यार जातीचा साप, खिडकीतून खोलीत एन्ट्री, मुलींच्या पायाला…; राज्यमंत्र्यांनी सांगितला आश्रमातील थरारक प्रसंग

गडचिरोलीतील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. मण्यार सापाने दंश केल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मण्यार जातीचा साप, खिडकीतून खोलीत एन्ट्री, मुलींच्या पायाला...; राज्यमंत्र्यांनी सांगितला आश्रमातील थरारक प्रसंग
| Updated on: Aug 11, 2026 | 1:21 PM

गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील तीन मुलींच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या तिन्ही मुलींना मण्यार जातीचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या थरारक घटनेचा प्रसंग राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच या घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिल्याचं राज्यमंत्री जायस्वाल यांनी सांगितलं.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, ‘गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये दुर्दैवी घटना घडली. त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लक्षात आले की, ज्या ठिकाणी मुली झोपत होत्या. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा होता. खिडकीच्या बाजूला विटा ठेवण्यात आल्या होत्या. त्याच दिशेने साप खोलीमध्ये शिरला. मण्यार जातीचा साप होता. जेव्हा तो दंश करतो, तेव्हा मुंगीसारखा दंश झाल्याचे जाणवते. एक नाही तर चार मुलींना सापाने दंश केला. तेव्हा सापाने दंश केल्याचे लक्षातच आले नाही. वारंवार सापाने दंश केल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि त्यावेळी विद्यार्थिनी झोपेतून उठल्या’.

‘या घटनेत मुलीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. दीपिका नावाच्या मुलीला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एक मुलगी गडचिरोली येथे उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे. पीडित कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. आश्रमशाळेची पाहणी केली असता असे लक्षात आले की, नियमानुसार त्या ठिकाणी जेवण दिले जात नाही. झोपण्याची व्यवस्था योग्य नाही. कर्मचारीही त्या ठिकाणी राहत नाहीत. १४ ऑगस्टला या संदर्भात बैठक ठेवण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनाही उचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

आश्रमशाळेवर भाष्य करताना म्हटलं आशिष जयस्वाल यांनी की, ‘काँग्रेसचे माजी आमदार कोवासे यांची ही आश्रमशाळा आहे. वर्षानुवर्षे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी ही आश्रमशाळा असल्याचे दिसून येते. अनुदान लाटण्याचे काम सुरू आहे. सर्व आश्रमशाळांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. नवीन अॅडव्हायजरी त्यांना सांगण्यात आली आहे. राज्य सरकार भरतीमधील घोटाळे बंद करीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे. ८० किलोमीटरचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. नवीन कार्यपद्धती पूर्णपणे तयार करू. सौदा तारखेला या संदर्भात बैठक घेतली आहे’.

आश्रमशाळेच्या कारवाईबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, ‘कोणाचीही आश्रमशाळा असो, कुठल्याही पक्षाची असो, सर्व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या वेदना समजून घेतल्या. नेमके विद्यार्थ्यांवर अनुदानातून किती खर्च होते, याचा आढावा घेतला. या घटनेमुळे जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा लक्षात आले की, त्या ठिकाणी गाद्या होत्या. वनक्षेत्रात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे खाली झोपवता येत नाही. त्या ठिकाणी खिडकीला जाळी नव्हती. चार-पाच ट्रक विटा त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. शिक्षकांची संख्या नव्हती. हा गलथान कारभार आहे. अतिशय कठोरपणे ही व्यवस्था दुरुस्त करण्यात येणार आहे. संबंधित मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्या ठिकाणी अटेंडंटसुद्धा राहत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये संचालकाचे लाड पुरवले जाणार नाहीत. या संदर्भात आदिवासी मंत्र्यांशी आज मी चर्चा करणार आहे. लवकरच बैठक घेण्यात येईल. जळावू लाकूड त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती’.

मुलींना साप चावल्याचं कळलंच नाही – जयस्वाल

‘ मुलींना साप चावल्याचं सुरुवातीला कळालंच नाही. सुरुवातीला डास चावल्यासारखं वाटलं त्यामुळे मुली उठल्याच नाहीत.
मात्र एका मुलीला वारंवार चावल्यामुळे ती झोपेतून उठली. तिने आरडा ओरडा केला, त्यानंतर समजलं. वसतीगृहाची पाहणी केल्यावर कळालं व्यवस्थीत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. १४ तारखेला बैठक लावली आहे, मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us