AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : रविवारची दुपार क्रिकेटप्रेमींसाठी खास; रोहित-कोहली मैदानात उतरणार, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे किती वाजता अन् कुठे पाहाल?

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर शाई होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचे आव्हान असेल.

IND vs WI : रविवारची दुपार क्रिकेटप्रेमींसाठी खास; रोहित-कोहली मैदानात उतरणार, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे किती वाजता अन् कुठे पाहाल?
India vs West IndiesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 10:00 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बहुप्रतीक्षित क्रिकेट मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. शाई होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांनी जोरदार सरावही सुरू केला आहे. दुसरीकडे, युवा स्टार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघही तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाला आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवारी, २७ सप्टेंबरला तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.

कधी आणि किती वाजता सुरू होणार सामना?

सामन्याचा थरार अनुभवण्यापूर्वी त्याची नेमकी वेळ जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून एकही महत्त्वाचा क्षण मिस होणार नाही. पहिला वनडे सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. त्याआधी अर्धा तास, म्हणजेच दुपारी १:३० वाजता नाणेफेक होईल. हा पूर्ण ५० षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने तो साधारणपणे साडेसात ते आठ तास चालेल. म्हणजेच, रात्री १० वाजेपर्यंत हा क्रिकेटचा थरार रंगण्याची शक्यता आहे. सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेच, क्रिकेटप्रेमी जिओ-हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याव्यतिरिक्त, तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर हा सामना मोफत पाहू शकता.

रोहित आणि विराटवर असणार सर्वांच्या नजरा

विंडीजच्या या भारत दौऱ्यात एकूण ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची प्रदीर्घ मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला आहे. या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, माजी कर्णधार विराट कोहली आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडूही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सर्वांचे लक्ष या दोघांच्या फलंदाजीवर असेल.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.

वेस्ट इंडिज: शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शामार जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत