AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद कांबळीच्या व्हिडीओने पुन्हा चिंता वाढवली; वृद्धाश्रमात दिसले, सेंटरच्या सुविधांबद्दलही सांगितलं, म्हणाले…

Vinod Kambli Video News: सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आहे. त्याने एका वृद्धाश्रमातून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विनोद कांबळीच्या व्हिडीओने पुन्हा चिंता वाढवली; वृद्धाश्रमात दिसले, सेंटरच्या सुविधांबद्दलही सांगितलं, म्हणाले...
| Updated on: Sep 25, 2026 | 10:28 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. तर दुःखही झाले आहे. या व्हिडिओमध्ये तो एका वृद्धाश्रमात दिसत आहेत. या दिग्गज खेळाडूला अशा अवस्थेत पाहून लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. या व्हिडिओत विनोद कांबळी आश्रमातील सुविधांबद्दल सांगत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी स्वतः त्या आश्रमातील सुविधा आणि सकारात्मक वातावरणाची प्रशंसा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विनोद कांबळी म्हणाला की, सध्या माझा आजार नियंत्रणात आहे. मला हे सांगायला आवडेल की येथील सुविधा खूप चांगल्या आहेत. स्वच्छता आणि इतर सर्व काही अगदी प्रथम श्रेणीचे आहे. येथे राहताना मला कधीच घरापासून दूर असल्यासारखे वाटत नाही. येथील लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळत आहे.

विनोद कांबळीचा हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवरील क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले. अनेकांनी त्याच्या अवस्थेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर काहींनी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. विनोद कांबळी गेल्या काही काळापासून आजारपण, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक समस्यांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी आधाराशिवाय चालू न शकण्याचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्याचे चाहते खूप दुःखी झाले होते.

विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने सुमारे ५४ च्या प्रभावी सरासरीने १,०८४ धावा केल्या आणि चार शतके झळकावली. तो सर्वात जलद १,००० कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज देखील आहे. अलीकडेच यशस्वी जैस्वाल हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु त्याने १६ डावांमध्ये हा पराक्रम केला. यानंतर तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एकदिवसीय सामन्यांमध्ये विनोद कांबळीने १०४ सामने खेळले. सुमारे ३२ च्या सरासरीने २,४७७ धावा केल्या. ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत