AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का ? भोंदूबाबा खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे संतापल्या

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला बलात्कार प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या पेनड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी करत, राजकीय संबंधांच्या चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

Sushma Andhare : एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का ? भोंदूबाबा खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे संतापल्या
सुषमा अंधारे आक्रमकImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 20, 2026 | 12:08 PM
Share

अनेक राजकारणी, मोठे नेते, सेलिब्रिटी यांची भविष्य सांगणारा, एकनाथ शिंदे , रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांनी ज्यांच्या मंदिरात हजेरी लावली अशा सिन्नर तालुक्यातील, स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेमुळे राज्यात मोठा खळबळ माजली आहे. एक महिलेवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी बुधवारी पहाटे खरात याला अटक केली असून तेव्हापासून तो आणि त्याची अनेक प्रकरणं चर्चेत आली आहेत. पोलिसांनी त्याला बेड्या तर ठोकल्याच, पण त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एका पेनड्राइव्हमध्ये अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील असे 58 व्हिडीओ सापडल्याने या प्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळालं आहे.

याप्रकरणावरून आता विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं असून सत्ताधारी पक्षातील काही लोकंही खरातच्या विरोधात उभी असल्याचे दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर गाटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे काही फोटोही समोर आल्याने त्या टीकेच्या धनी ठरल्या असून अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिवसेन उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेदेखील या प्रकरणावरून प्रचंड आक्रमक झाल्या असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले. अंधारे यांनी बरेच पुरावे मांडत रुपाली चाकणकरांवर अनेक आरोप केले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घ्याव अशी मागणीही अंधारे यांनी केली. तसेस अनेक स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या या खरातला भोंदू बाबा न म्हणता त्याला विकृत बाबा असं म्हटलं पाहिजे, असं म्हणत अंधारे यांनी हल्ला चढवला.

अनेक राजकारण्यांशी संबध

राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पक्षातील नेते खरात याच्या संपर्कात होते. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके या नेतेमंडळींचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संपर्क होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अटक झालेला हा भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी केल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासंदर्भातील अनेक फोटो, तसेच व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. तसेच जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांहेही खरातांसोबतचे काही फोटो समोर आले होते. एवढंच नव्हे तर नोव्हेंबर 2022 मध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरालाहीव भेट दिली होती, त्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. याच मुद्यावरून सुषमा अंधारे यांना सवाल विचारण्यात आला.

एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची हिंमत आहे का ?

एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो समोर आला आहे, शिंदे यांचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्ट पुढे येत आहे. दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला जात होते, असं पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे. त्यांनी पुढे जाऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. जे सो कॉल्ड पॉलिटिकल लोक आहेत, त्या सगळ्यांना तपासण्याची जबाबदारी ही गृहखात्याची आहे. एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का ? असा रोखठोक सवाल अंधारे यांनी विचारला. कारण एकनाथ शिंदे हे ज्यांच्याकडे नेहमी जातात, त्या अमिक शाह यांच्यासबोत कॅप्टन खरातचा फोटो आहे, हे खूप महत्वाचं आहे. जयंत पाटील , नार्वेकरांचीही चौकशी करा. माझ्या पक्षााचा जरी कोणी यात अडकला तर त्याचीसुद्धा यात गय केली जाऊ नये, हा प्रश्न लेकीबाळींच्या इभ्रतीचा आहे, असं अंधारे यांनी सुनावलं. रुपाली चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी