AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू खरातचा मामेभाऊ पहिल्यांदाच समोर, केलेल्या विधानाने सगळेच चकित, म्हणाले, ज्या वेळी…

Ashok Kharat Cousin : अशोक खरातने अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहेत. अशातच आता खरातच्या मामेभावाने या प्रकरणावर भाष्य केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भोंदू खरातचा मामेभाऊ पहिल्यांदाच समोर, केलेल्या विधानाने सगळेच चकित, म्हणाले, ज्या वेळी...
Ashok Kharat CousinImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 25, 2026 | 9:38 PM
Share

भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहेत. खरातवर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याची एसआयटीकडून आणि पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. खरातने भोंदुगिरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवली होती अशी माहितीही समोर आली आहे, तसेच त्याने नरबळी दिल्याचाही आरोप होत आहे. अशातच आता खरातच्या मामेभावाने या प्रकरणावर भाष्य केले आहे. अशोक खरातच्या कुटुंबात कोण कोण आहे? तसेच त्याचे आणि नातेवाईकांचे संबंध कसे होते याचीही माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या मामेभावाने काय म्हटले ते जाणून घेऊयात.

अशोक खरातच्या मामेभावाची प्रतिक्रिया

शिर्डी जवळील काकडी हे अशोक खरातचे आजोळ आहे. अशोक खरातच्या मामेभावाने म्हटले की, ‘अशोक खरात याला दोन आई. पहिली आई डोंगरगावची तर दुसरी आई आमची आत्या या काकडी गावची आहे, आमच्या आत्याच वय 96 वर्षे आहे. आमचा संबंध केवळ कौटूंबिक कार्यक्रमात यायचा. खरात हा खूप कमी वेळी आजोळी यायची. पहिल्या आईला पाच मुले तर दुसरी आई आमची आत्या यांना दोन मुले. ते सर्व कहांडळवाडी येथे राहतात.

अशोक खरातच्या मामेभावाची मोठी मागणी

पुढे अशोक खरात बाबत दररोज जे खुलासे होत आहेत याबाबत बोलताना मामेभाऊ म्हणाले की, ‘मीडियावर ज्या गोष्टी समोर आल्या त्याबाबत आम्हाला माहिती नाही. आम्ही हे मीडीयावर पहिल्यांदाच पाहतोय. ज्यावेळी आत्याचे लग्न झाले त्यावेळी सर्व शेतकरी समाज होता त्यामुळे आमच्या आजोबांनी लग्नाचा निर्णय घेतला. काकडी मध्ये खरेदी केलेल्या जमिनीविषयी आम्हाला कल्पना नव्हती. झालेल्या प्रकाराबाबत आता SIT चौकशी सुरू आहे, निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.’

अशोक खरात भोंदू बाबा कसा बनला?

अशोक खरातच्या परिचयातील व्यक्ती राजेंद्र खताळे यांनी सांगितले की, ‘खरातचे कुटुंबाशी वाद झाले होते त्यावेळी तो घर सोडून गेला होता. तो दहावी नापास असून कॅप्टन नाही. त्याची एक एसटीडी देखील होती, तिथून त्याच्या भोंदूगिरीची सुरुवात झाली. तो प्लॉटिंग व्यवसाय करू लागला, त्यानंतर लग्न जुळवू लागला, त्यातून नंतर भविष्य सांगायला लागला. त्याने एकदा गॅस टाकी देखील चोरली होती. एक लग्न जुळवण्याच्या वेळी त्याचे माझे संबंध आले, मात्र मी त्याला नाही म्हणून सांगितले. तो भोंदू असल्याचा मला माहित होतं. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला