AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case : भविष्य, सेक्स आणि महिला… अशोक खरातचा लिंगपिसाटपणा कसा आला बाहेर? ऑफिस बॉयने पीडित महिलेच्या…

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकारण्यांशी त्याचे संबंध, ५८ अश्लील व्हिडीओ आणि कार्यालयातील ऑफिस बॉय नीरज जाधव याच्याकडून ब्लॅकमेलचा प्रकार उघड झाला. हे प्रकरण आता एसआयटीकडे असून, तपासादरम्यान नीरज जाधवच्या भूमिकेवर आणि शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Ashok Kharat Case : भविष्य, सेक्स आणि महिला... अशोक खरातचा लिंगपिसाटपणा कसा आला बाहेर? ऑफिस बॉयने पीडित महिलेच्या...
भोंदू बाबा अशोक खरात
| Updated on: Mar 20, 2026 | 12:54 PM
Share

Ashok Kharat Case : अनेक राजकारणी, नेतेमंडळीपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचे भविष्य सांगण्याचा आणि ग्रह-ताऱ्यांच्या साहाय्याने लोकांचे नशीब बदलण्याचा दावा करणारा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat)  याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली बेड्या ठोकून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकारणातील अनेक लोकांशी असलेलं त्याचं कनेक्शन उघड झालं आहे, अनेक नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आले असून चांगलीच खळबळ माजली आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं असून राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. खरात याला अटक झाली, त्याचे काही अश्लील व्हिडीओ देखील समोर आले. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 58 व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला असून पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते या, तपासाचे नेतृ्तव करत आहेत. मात्र खरात याचे ते अश्लील व्हिडीओ समोर कसे आले, त्याचा लिंगपिसाटपणा कसा बाहेर आला ? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अशोक खरातचा लिंगपिसाटपणा कसा आला बाहेर?

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात अशोक खरात याने अनेक महिलांना टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. आणि अशोक खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हाच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती देखील समोर येत आहे. डिसेंबर 2025 मध्ये नीरज याने अशोक खरात याच्या नकळत, कार्यालयात महिलांवर झालेल्या बलात्काराचे, अत्याचाराचे 58 सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेतली.

पैशांची हाव आणि कोट्यवधींच्या खंडणीची मागणी

महिलांवर अत्याचार करून, अशी दुष्कृत्य करूनही अशोक खरात हा समाजात ‘साधू’ म्हणून वावरत होता, ते पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने अत्याचाराचे ते व्हिडीओ ताब्यात घेतले आणि त्याच व्हिडीओच्या माध्यमातून त्याने खरात याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी, या आक्षेपार्ह क्लिप्सच्या बदल्यात अशोक खरात याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती अशीही माहिती समोर आली आहे. मात्र अशोक खरात याने त्याला काहीच दाद दिली नाही. त्याने नीरजच्या धमक्यांना भीक घातली नाही, जे करायचं ते कर असं म्हणत त्याने नीरजला उडवून लावलं.

मेहुण्याला पाठवला व्हिडीओ आणि…

अखेर नीरज जाधव याने पीडित महिलांचीच मदत घेण्याचा प्रयत्न केला. शिर्डीतील एका 24 वर्षांच्या विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ नीरजने तिलाचा व्हॉट्सॲपवर पाठवले आणि तिला धमकावलं. ते पाहून त्या पीडित महिलेने यासंदर्भात अशोक खरातल याला कळवलं. मात्र यातून स्वतःला वाचविण्यासाठी अशोक खरातने त्या महिलेलाचा पोलिसात जाण्यास सांगितलं. एवढं करूनही खरातकडून काही पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात आल्याने नीरज जाधव याने तोच व्हिडीओ सिडको येथील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठवला. ते पाहून मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि फिर्याद नोंदवण्यासाठी प्रोत्साहन दिलं, अखेर ती पीडित तरूणी पोलिसांत गेली आणि त्यानंतरच भोंदू बाबाचं घाणेरडं कृत्य उघडकीस आलं, अशी माहिती समोर आली.

ऑफिस बॉय नीरज जाधव पोलीसांच्या हाती का लागेना ?

दरम्यान एका महिलेच्या तक्रारीनूसार निरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2026 ला गुन्हा दाखल झाला होता. नीरज जाधवने पिडीत महिलेला कॅप्टन खरातच्या ऑफिसमधील आक्षेपार्ह व्हिडीओचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावले होते. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र तिच्या क्रारीची शिर्डी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, त्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित होत आहे. एक महिना उलटूनही नीरज जाधवचा शोध का लागत नाही ? कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव पोलीसांच्या हाती का लागेना ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिर्डी पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी