AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात प्रकरण शिरूरपर्यंत… कार्यक्रमाला अनेक नेत्यांची हजेरी, मोठी माहिती समोर

Ashok Kharat : अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता अशोक खरातच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते हजर असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरण शिरूरपर्यंत... कार्यक्रमाला अनेक नेत्यांची हजेरी, मोठी माहिती समोर
Ashok Kharat Shirur LeadersImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 20, 2026 | 4:40 PM
Share

नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होतो. तसेच अनेकही काही राजकारणी मंडळीचे खरासोबत संबंध असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील काही नेते हे अशोक खरातच्या कार्यक्रमालाला हजर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अशोक खरातच्या व्हिडिओमध्ये शिरूरचे नेते

नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त अध्यात्मिक व्यक्ती अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी दिसत असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात अशोक खरात यांच्या मागे शिरूर तालुक्यातील काही नेते बसले असल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमातील हे नेते आणि अशोक खरात योगायोगाने एकत्र आले होते की त्यामागे काही वेगळे राजकीय किंवा सामाजिक समीकरण होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशोक खरात यांच्यासोबतच्या व्हिडिओबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नाही, त्यामुळे या व्हिडिओमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आता संशयाची सुई स्थानिक राजकीय नेत्यांकडे वळत असून, येत्या काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. तसेच शिरूरमधील नेते खरंच खरातच्या संपर्कात होते का हेही आगामी काळात समोर येण्याची शक्यता आहे.

भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांच्या वतीने केली जात आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल. तसेच अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी