AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला घेतलं ताब्यात, मोठे खुलासे होणार?

Ashok Kharat Case : भोंदूबाबा ज्योतिषी अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिंसानी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

कॅप्टन खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला घेतलं ताब्यात, मोठे खुलासे होणार?
Ashok Kharat Niraj Jadhav Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 20, 2026 | 6:24 PM
Share

संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाकडे लागलेले आहे. भोंदूबाबा ज्योतिषी अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटोदेखील समोर आले आहेत. तसेच खरातचे राज्यातील अनेक राजकीय लोकांसोबत संबंध असल्याचेही समोर आले आहे. अशातच आता नाशिक पोलिंसानी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. कॅप्टन खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांच शाखेच्या ताब्यात आहे. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. त्यामुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अशोक खरातच्या आणखी कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

500 कोटींची संपत्ती

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादीही समोर आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरातच्या सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये संपत्ती

अशोक खरातच्या नावावर पाथर्डी येथील विविध सर्व्हे क्रमांकांमध्ये सुमारे 30 एकर जमीन असून, तिची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये आहे. तसेच गौळाणे शिवारात कुटुंबीयांच्या नावे सुमारे 30 कोटी रुपयांची जमीन आहे. मिरगाव आणि कहांडळवाडी परिसरात 45 एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये आहे. मिरगाव येथील भव्य फार्म हाऊसची किंमत सुमारे 13 कोटी रुपये आहे. ओझर विमानतळाजवळ देखील जमीन आहे. कर्मयोगीनगर येथे आलिशान बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची किंमत 200 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी