सर्वात मोठी बातमी… रुपाली चाकणकरांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा काय? म्हणाल्या, मेंटॉस बाई…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. चौकशीस गैरहजर राहिल्यास त्यांना अटक होऊ शकते, असा मोठा दावा राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका करत ‘मेंटॉस बाई’ असे म्हटले. खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी... रुपाली चाकणकरांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा काय? म्हणाल्या, मेंटॉस बाई...
रुपाली चाकणकरांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा काय?
| Updated on: Mar 31, 2026 | 1:21 PM

भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्याची खरातची मोडस ऑपरेंडी समोर येत आहे. तसेच महिला आयोगाकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांना खरातकडे पाठवले जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणी खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यातील एक माजी सदस्या रुपाली चाकणकर यांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. तरीही त्या चौकशीला हजर झाल्या नाहीत. त्या चौकशीला हजर राहिल्या नाही तर त्यांना अटक होऊ शकते. ही कायद्याची प्रक्रियाच आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर या एसआयटी चौकशीला स्वत:हून सामोरे जाणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मीडियाशी संवाद साधत असताना हा सर्वात मोठा दावा केला आहे. खरात प्रकरण एसआयटीकडे गेले. आज आठ दिवस झाले. काल रुपाली चाकणकर यांना एसआयटीचं समन्स गेलं होतं. त्यामुळे त्या आता आजाराचं कारण देऊ शकत नाही. एसआयटीने कुठल्या तरी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय या आविर्भावात त्या असतील. पण हे निमंत्रण नाही. एका भयंकर गुन्ह्यासाठीचं समन्स आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

तिथे तोरा चालत नाही

पहिलं कारण सांगितलं आजारी आहेत.. पण याच्यानंतर? त्यांना चौकशीसाठी जावंच लागेल. नाही गेल्या तर अटक करावी लागेल. ती कायद्याची प्रोसेस आहे. तिथे कुठलाही तोरा चालत नाही. त्यांना कुठलं गांभीर्य नाही. अशी व्यक्ती महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी होती. याचा मला खेद वाटतो. मेंटॉस बाई आहे ही, अशी टीकाच रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

मला खेद वाटतो

त्या माध्यमांसमोर आता कधीच बोलू शकत नाहीत. सगळा मागचा इतिहास काढा. त्यांच्या चुकांवर त्या कधी बोलत नाहीत. दोन दिवसात मी पुराव्यासह तुमच्यासमोर येईल, एवढंचं त्या म्हणतात, असं म्हणतं रूपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांची मिमिक्रीही केली.

त्या या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. नेत्यांकडून त्यांना जो फेवर देण्यात आला, त्यामुळे त्यांची मानसिकता तशी झालेली आहे. कायद्याने हे एवढं सोप्पं नाही याची प्रचिती काही दिवसात त्यांना येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

रायगड कनेक्शनचीही चौकशी

यावेळी रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या रायगड कनेक्शनवरही टीका केली. रूपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर हे रायगडच्या रोहा येथे 400- 500 कोटींची उलाढाल असणाऱ्यांसोबत पार्टनरशिप करतात. याची ईडी, इन्कम टॅक्सकडून चौकशी होणार आहे. कारण त्या तक्रारी तिकडेही गेलेल्या आहेत. एक चुकीची बाई देऊन अख्या राजकारणाला काळा डाग बसवला. यापुढे राजकारण्यांनी नैतिकता बघून गोष्टी करणे गरजेचे आहे. पक्षाच्या बाहेर तुम्ही कुणाचीही संबंध ठेवा. 10 नाहीतर 25 जणींशी संबंध ठेवा. पण त्यांचे लाड पुरवण्याचs काम पक्षातून होता कामा नयेत. अन्यथा अशी वाईट वेळ येते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us