AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, शाळांना सुट्टी; पावसाचं संकट किती दिवस राहणार? मुख्यमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती

devendra fadnavis : मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मोठी विनंती केली आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, शाळांना सुट्टी; पावसाचं संकट किती दिवस राहणार? मुख्यमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
| Updated on: Jul 04, 2026 | 2:25 PM
Share

महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि जवळच्या शहरातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने ठाणे, मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMRDA Region) कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. आता कोसळणारा पाऊस हा अपेक्षेपेक्षा जास्त असून येत्या 6 तारखेपर्यंत असाच पाऊस कोसळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील पावसाविषयी महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ राज्यात मुसळधार पाऊस आहे. अलर्ट दिलेला आहे. वादळ येतील. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस येण्याचा अलर्ट देत आहोत. दर तीन तासाने अलर्ट देत आहोत. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. प्रवास टाळता आला तर टाळता आला पाहिजे असं सांगितलं. वादळ आहे. काही फटका बसू नये याचा अलर्ट दिला आहे. यावेळी नीट अलर्ट देत आहोत. लोकांनी अलर्ट फॉलो करावा. त्याप्रमाणेच बाहेर पडावं, अशी माझी विनंती आहे’.

त्याबाबत योग्य काळजी घेईल : फडणवीस 

दोन दिवसांपूर्वी मुंबई- पुण्यातील कनेक्टिंग लिंकवर दोन खड्डे आढळून आले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टेड आहेत, तिथे दोन खड्डे आहे. पूर्ण लिंकवर खड्डे पडले नाहीत. काही लोकांना कोणत्या गोष्टीला रेक्टिफाय करायचं, यात आनंद आहे. काम झाल्यावर पावसात दुसरी लेअर येते. त्यात आपण काही अडचणी टेस्ट करत असतो. पण हरकत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी. एमएसआरडीसी त्याबाबत योग्य काळजी घेईल. अनेक ठिकाणी केलेलं काम सेटल कराव्या लागतात. या इंजिनीअरिंग गोष्टी आहेत. कुठे कमतरता असेल तर दुरुस्त करता येईल. देशातील सर्वात उंच पूल, उंच रस्ते, डॅमच्या खाली बोगदा आपण केलं आहे. निव्वळ टीका करणं योग्य नाही’.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ