AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : इंडोनेशियाला ब्रह्मोस देणार त्या बदल्यात मोदींना त्यांच्याकडून तितकीच महत्वाची गोष्ट हवी, भारताच्या भविष्यासाठी खूप आवश्यक

PM Modi Indonesia Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यात इंडोनेशियाचा दौरा खूप महत्वाचा आहे. या दौऱ्यामध्ये भारताची रणनितीक उद्दिष्ट्य दडलेली आहेत. म्हणून पीएम मोदींचा हा दौरा खूप महत्वाचा असणार आहे.

PM Modi : इंडोनेशियाला ब्रह्मोस देणार त्या बदल्यात मोदींना त्यांच्याकडून तितकीच महत्वाची गोष्ट हवी, भारताच्या भविष्यासाठी खूप आवश्यक
PM Modi Indonesia Tour
| Updated on: Jul 04, 2026 | 3:01 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 जुलैपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. पीएम मोदी सर्वात आधी इंडोनेशियाला जातील. तिथे मोदी भारताच्यावतीने एक महत्वाची डील करणार आहेत. त्यामुळे भारताची डिफेन्स निर्यात आणि ऊर्जा सुरक्षा अजून भक्कम होईल. इंडोनेशियाला भारताकडून अजून ब्रह्मोस मिसाइल हवी आहेत. त्यामध्ये त्यांनी रस दाखवला आहे. भारताला इंडोनेशियाकडून क्रिटिकल मिनिरल्स हवे आहेत. मार्च महिन्यात भारत आणि इंडोनेशियामध्ये ब्रह्मोस बॅटरी संदर्भात करार झाला आहे. पण इंडोनेशियाला ही मिसाइल्स विकत घेण्यासाठी सोप्या अटींची कर्ज सुविधा हवी आहे. “इंडोनेशियाचाया सोबतच्या संबंधात संरक्षण सहकार्य एक महत्वाचा भाग आहे. पण यावर आता विस्ताराने बोलण्याची गरज नाही. कारण आपण या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. सर्व गोष्टी तयारीच्या टप्प्यावर आहेत” असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद टंडन यांनी प्रिंटला सांगितलं.

इंडोनेशियाने भारतासोबत ब्रह्मोस मिसाइलची बॅटरी विकत घेण्यासाठी प्रारंभिक करार केला होता. आता इंडोनेशियाला भारताकडून अजून ब्रह्मोस मिसाइल्स हवे आहेत. त्यांनी भारताकडे सोप्या क्रेडिट लाइनची मागणी केली आहे. म्हणजे त्यांना सोप्या अटींवर कर्ज हवं आहे. इंडोनेशियाला दक्षिण चीन समुद्रात चीनच्या आक्रमकतेचा सामना करायचा आहे. त्यांना किनारपट्टीची सुरक्षितता आणि हल्ला करण्याची क्षमता वाढवायचा आहे.

भारताचा उद्देश काय?

इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात जास्त निकलच प्रोडक्शन होतं. हे एक क्रिटिकल मिनरल आहे. इलेक्ट्रिक कारच्या बॅटऱ्यांसह स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान निर्मितीमध्ये निकलची गरज लागते.

भारत आपल्या स्टील उत्पादनासाठी 80 टक्क्यापेक्षा जास्त फेरोनिकल इंडोनेशियाकडून विकत घेतो. मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय कंपन्या इंडोनेशियन कंपन्यांसोबत मिळून महत्वाचा करार करु शकतात.

सध्या इंडोनेशियाच्या निकल उत्पादन क्षमतेवर 75 टक्क्यापेक्षा जास्त चीनचं नियंत्रण आहे. इंडोनेशियाला सुद्धा चीनचा कंट्रोल कमी करायचा आहे. भारताला चीनवर अवलंबून राहणं कमी करायचं आहे.

एक मोठा रणनितीक डावपेच

भारताचा ग्रेट निकोबार द्वीपसमूह इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक दृष्ट्‍या इंडोनेशिया भारताच्या जवळच्या शेजाऱ्यांपैकी एक आहे. म्हणून इंडोनेशिया सोबतचा ब्रह्मोस मिसाइल करार भारतासाठी एक मोठा रणनितीक डावपेच आहे. इंडोनेशियाच्या क्रिटिकल मिनरल्सवर चीनचा ताबा आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?