AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती

100 वर्षे जुनी प्रचंड सुपरहिट गझल, जिला गुलाम अली आणि जगजीत सिंग यांनी बनवलं प्रचंड लोकप्रिय, आजही ऐकताच ताज्या होतात जुन्या आठवणी. दिवसभर मनातून जात नाही संगीत.

100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 04, 2026 | 2:17 PM
Share

संगीताच्या दुनियेत काही गाणी आणि गझल अशा आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. अशाच गझलपैकी एक म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल आजही संगीतप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करते. प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी 1982 मध्ये आपल्या आवाजातून तिला अमरत्व दिले तर नंतर जगजीत सिंह यांच्या सादरीकरणामुळे ती नव्या पिढीपर्यंत पोहोचली. आता धुरंधर 2 मध्ये या गझलेची धून ऐकू आल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे.

‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’ ही गझल प्रसिद्ध शायर आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना हसरत मोहानी यांनी लिहिली होती. ही गझल नेमकी कोणत्या वर्षी लिहिली गेली याची अधिकृत नोंद उपलब्ध नसली तरी ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात लिहिली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे ही गझल जवळपास शतकभर जुनी मानली जाते.

‘निकाह’ चित्रपटामुळे मिळाली मोठी लोकप्रियता

ही गझल आधीपासून अस्तित्वात असली तरी तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या निकाह या चित्रपटामुळे. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या या चित्रपटासाठी गुलाम अली यांनी आपल्या सुरेल आवाजात ही गझल सादर केली आणि ती घराघरात पोहोचली. त्यांच्या भावपूर्ण गायकीमुळे ही गझल संगीतविश्वातील अजरामर कलाकृतींपैकी एक ठरली.

‘धुरंधर 2’मुळे पुन्हा चर्चेत

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये या गझलेची धून ऐकायला मिळते. चित्रपटात रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा आणि गौरव गेरा यांनी साकारलेल्या आलम भाई यांच्या संवादादरम्यान या गझलेचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील हा छोटासा प्रसंगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर अनेकांनी या गझलेच्या वापराचे कौतुक केले आहे.

प्रत्येक पिढीतील श्रोते आपल्या अनुभवांनुसार या गझलेचा अर्थ नव्याने अनुभवतात. म्हणूनच जवळपास शंभर वर्षांनंतरही ही गझल मैफिली, चित्रपट आणि संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच आवडीने ऐकली जाते. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, तरी या गझलेची भावनिक ताकद आणि सुरांची जादू आजही तितकीच प्रभावी आहे.

Follow Us
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट...
अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप
Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!
Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा