AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातचं आता काही खरं नाही, तरुणीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्यात काय घडलं?

अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टात

अशोक खरातचं आता काही खरं नाही, तरुणीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्यात काय घडलं?
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 24, 2026 | 4:26 PM
Share

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत असून, कायद्याचा फास त्याच्याभोवती अधिकच घट्ट होत चालला आहे. अटक होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असला तरी, त्याच्यावर दाखल असलेल्या 15 गुन्ह्यांमुळे चौकशीचा ससेमिरा थांबण्याचे नाव घेत नाहीये. या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) अत्यंत बारकाईने केला जात आहे. खरातची स्थिती सध्या अशी झाली आहे की, एका गुन्ह्यात त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली की, लगेच दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीकडून त्याचा ताबा घेतला जात आहे.

खरातच्या कृत्यांचे अत्यंत धक्कादायक तपशील समोर

गुरुवारी न्यायालयाने खरातला पाचव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, परंतु हा दिलासा फार काळ टिकला नाही. कालच एसआयटीने सहाव्या गुन्ह्यासाठी त्याचा ताबा घेतला आणि आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी खरातच्या कृत्यांचे अत्यंत धक्कादायक तपशील न्यायालयासमोर मांडले.

दैवी चमत्काराचा खोटा दावा करून आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून खरातने एका तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. या गुन्ह्यात तो पीडितेला गुंगीकारक औषध मिसळलेले पाणी पाजायचा, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हे औषध नेमके कोणते होते आणि धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने आणखी किती आर्थिक फसवणूक केली, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

सहाव्या गुन्ह्यात 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी या पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. सर्व गुन्ह्यांचे स्वरूप सारखेच असताना पुन्हा पुन्हा तपासाच्या नावाखाली आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीस कोठडीत केवळ आरोपीला बसवून ठेवण्याने तपासात काय साध्य होणार आहे, असे म्हणत त्यांनी कोठडीची मागणी फेटाळण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात 26 एप्रिलपर्यंत, म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तीन दिवस खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार असून, यादरम्यान त्याच्या आणखी काही काळ्या कारनाम्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच