AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरातची कुंडली समोर, 4 वर्षात किती प्रॉपर्टीची खरेदी? धक्कादायक माहिती उघड

नाशिकच्या अशोक खरातने ४ वर्षांत ७० कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचे SIT तपासात उघड झाले असून, रोख व्यवहारांच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.

भोंदू बाबा अशोक खरातची कुंडली समोर, 4 वर्षात किती प्रॉपर्टीची खरेदी? धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat 9
| Updated on: Apr 02, 2026 | 10:07 AM
Share

आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली सर्वसामान्य भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातबद्दल दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातचे काळे कृत्य दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहे. त्यातच आता विशेष तपास पथक (SIT) च्या चौकशीत अशोक खरातची गेल्या ४ वर्षातील कुंडली काढली आहे. यात अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

विविध मालमत्तांची मोठी खरेदी

अशोक खरात प्रकरणी सुरु असलेल्या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानुसार, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने विविध मालमत्तांची मोठी खरेदी केली आहे. यात जमिनी, फ्लॅट्स आणि व्यावसायिक गाळे अशा मालमत्तांचा समावेश आहे. या विविध स्वरूपात त्याने गुंतवणूक केली आहे. अशोक खरातने ४ वर्षांत ७० कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचे SIT तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यातील ७० ते ८० टक्के पेमेंट हे रोख म्हणजे कॅश स्वरुपात करण्यात आले, जेणेकरून आयकर विभाग किंवा इतर यंत्रणांच्या नजरेत हे व्यवहार येऊ नयेत.

पार्टनर्सच्या नावे गुंतवणूक

एसआयटीने अशोक खरातचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक बड्या व्यक्तींशी झालेले चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी सापडल्या आहेत. गेल्या ७२ तासांत तीन वेळा अशोक खरातच्या बँक खात्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. अधिकृत उत्पन्नाचा स्रोत नसतानाही खात्यांमध्ये होणारी मोठी उलाढाल संशयाच्या भोवऱ्यात आहे. अशोक खरातने अनेक ठिकाणी स्वतःचे नाव न लावता पार्टनर्सच्या नावे गुंतवणूक केली आहे. हे पार्टनर्स कोण आहेत, याची आता कसून चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे नाशिकमधील त्याच्या आलिशान बंगल्याचे आणि कार्यालयाचे काम करताना खरातने पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. केवळ फर्निचर आणि बांधकामाच्या मजुरीसाठी त्याने सुमारे २५ लाख रुपये कामगारांना रोख दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कोणताही अधिकृत हिशोब नसल्यामुळे हे सर्व पैसे फसवणुकीच्या माध्यमातून जमा झाल्याचा संशय बळावला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात ताबा; चौकशीचा फेरा वाढणार

दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आता एसआयटीने दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवला आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयात विशेष अर्ज सादर केला होता. आता नव्या चौकशीत खरातच्या कॅश नेटवर्कमधील अन्य साथीदार आणि त्याला राजकीय किंवा प्रशासकीय अभय देणाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...