AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने पोलीस चौकशीत 'दुनिया झुकती है' असे म्हणत स्वतःच्या कृत्यांचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे. महिलांची फसवणूक आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेल्या खरातने विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून लोकांना कसं गंडवलं, याचाही खुलासा केला आहे.

पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ...
Ashok kharat
| Updated on: Apr 07, 2026 | 11:35 AM
Share

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातच्या पोलीस चौकशीदरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता नुकतंच पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान अशोक खरातने धक्कादायक विधान केले आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे उद्गार अशोक खरातने काढले आहे. याद्वारे त्याने स्वत:च्या कृत्यांचा निर्लज्जपणे बचाव करण्याचा प्रयत्न केल्याच्या पाहायला मिळत आहे.

अशोक खरातचा माज उतरेना

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातवर आतापर्यंत १० पेक्षा जास्त फसवणुकीचे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या प्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मात्र इतकं सर्व होऊनही अशोक खरातचा माज उतरला नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता अशोक खरातने चौकशीदरम्यान अत्यंत अहंकारात दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे विधान केले आहे.

निर्दोष सिद्ध करण्यासाठी केली विचित्र विधाने

महिलांवर अत्याचार आणि फसवणूक केल्याचा कोणताही पश्चात्ताप अशोक खरातच्या चेहऱ्यावर दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याउलट तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी विचित्र विधाने करत आहे. यापूर्वी झालेल्या चौकशीतही खरातने पोलिसांना चक्रावून सोडले होते. त्याने आपल्यावरील आरोपांचे समर्थन करताना म्हटले होते की, महिलांसोबत केलेली कृत्ये हा केवळ एका विधीचा भाग होता. माझ्या अंतर्मनानेच मला आज धोका दिला आहे, मी आजवर ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले आहेत, असे विधान त्याने पूर्वीच्या तपासात केले होते. तसेच कोठडीत असतानाही तो सतत मंत्रजप करण्याचे ढोंग करतो. आता मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असेही तो बडबडत असतो.

पोलिसांनी गोळा केले पुरावे

अशोक खरातच्या या विचित्र वागण्यामुळे पोलीस यंत्रणाही थक्क झाली आहे. कोठडीत बसून मंत्रजप करणे, विचित्र पुटपुटणे आणि स्वतःच्या कृत्यांचे दैवी विधी म्हणून समर्थन करणे, यावरून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नाशिक पोलिसांनी तसेच एसआयटीने त्याच्या तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. तसेच तो करत असलेल्या सर्व काळ्या कृत्यांचे सविस्तर पुरावे पोलिसांकडून गोळा केले जात आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...