AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप, वाघाचं कातडं अन्… भोंदूबाबा खरातचे आणखी एक अघोरी कृत्य समोर, काळजात भरेल धडकी

नाशिक पोलिसांनी भोंदू बाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. रिमोट कंट्रोलचा साप, बनावट वाघाचे कातडे आणि संमोहनाचा वापर करून हाय-प्रोफाईल लोकांना लुटणाऱ्या या मर्चंट नेव्हीच्या माजी कॅप्टनचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

साप, वाघाचं कातडं अन्... भोंदूबाबा खरातचे आणखी एक अघोरी कृत्य समोर, काळजात भरेल धडकी
Ashok Kharat
| Updated on: Mar 23, 2026 | 7:43 AM
Share

मर्चंट नेव्हीचा माजी कॅप्टन ते १०० कोटींच्या साम्राज्याचा भोंदू सम्राट असा प्रवास करणाऱ्या अशोक खरातचे अनेक अघोरी कृत्य आता समोर येत आहेत. नुकतंच नाशिक पोलिसांनी त्याच्या आणखी एका अघोरी कृत्याचा पर्दाफाश केला आहे. अध्यात्माच्या नावाखाली राजकारणी, अधिकारी आणि सर्वसामान्यांना लुटणाऱ्या या भोंदू बाबा खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर आता त्याच्या काळ्या साम्राज्यातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब समोर

अशोक खरात हा केवळ अंधश्रद्धा पसरवत नव्हता, तर त्याने फसवणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि साहित्याचा वापर केला होता. अशोक खरात मंदिर परिसरात बनावट साप ठेवत असे. हा साप रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हलवून तो भाविकांना साक्षात ईश्वरी संकेत असल्याचे भासवायचा. या भीतीपोटी अनेक भाविक त्याच्या चरणी शरण येत असत.

त्यासोबतच दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःकडे अघोरी शक्ती असल्याचे दाखवण्यासाठी तो नकली वाघाच्या कातड्याचा वापर करायचा. मंदिर परिसरात अशा वस्तू ठेवून तो तिथले वातावरण गूढ आणि भीतीदायक बनवत असे. त्यासोबतच अशोक खरातने संमोहन (Hypnotism) कलेचा गैरवापर केल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. ही कला वापरुन तो लोकांच्या मनावर ताबा मिळवायचा. एकदा का व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली आली की, अघोरी विधींच्या नावाखाली तो त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचा.

१०० रुपयांची वस्तू लाखांना विकायचा

खरातची आर्थिक फसवणूक करण्याची पद्धत अत्यंत चपखल होती. तो बाजारात सहज आणि स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून ते अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक असल्याचे सांगायचा. ज्या वस्तूची किंमत १०० रुपयेही नसेल, ती वस्तू तो १० हजार ते चक्क १ लाख रुपयांपर्यंत विकायचा. याशिवाय, काचेचे तुकडे आणि साधे खडे दैवी रत्ने असल्याचे सांगून त्याने भाविकांची मोठी आर्थिक लूट केली आहे.

अशोक खरातच्या दरबारात केवळ सामान्य लोकच नाही, तर राज्यातील बडे राजकारणी, आयएएस-आयपीएस अधिकारी आणि उद्योजक हजेरी लावत असत. याच हाय-प्रोफाईल संपर्कांमुळे त्याचे गुन्हेगारीचे जाळे विस्तारत गेले. आर्थिक फसवणुकीसोबतच खरातवर अत्यंत गंभीर असे लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. पोलिसांना खरातचे सुमारे ५८ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. पतीच्या जिवाला धोका असल्याचे सांगून किंवा विशेष पूजा करण्याच्या बहाण्याने तो महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा. एका पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर या गंभीर घटनांना वाचा फुटली.

दरम्यान नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) ही मोठी कारवाई केली आहे. खरातच्या ठिकाणाहून रिमोट कंट्रोलचे साप, बनावट रत्ने, अघोरी साहित्य आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याच्या बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी आयकर विभागही मैदानात उतरला आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत