AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Scandal : मी अवतारी पुरूष, तू मागील जन्मातील अप्सरा, भोंदू खरातचे घटस्फोटीत महिलेसोबतही अश्लील कृत्य, आणखी एक कारनामा उघड

भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. ज्योतिषी, भविष्यवेत्ता असल्याचे सांगत अनेक महिलांना फसवून त्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. महिलांच्या अडचणींचा गैरफायदा घेत खरातने त्यांना लग्नाचे आमिष दाखवले आणि गर्भवती झालेल्या महिलेचा गर्भपातही घडवला. सध्या तो अटकेत असून त्याच्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Ashok Kharat Scandal : मी अवतारी पुरूष,  तू मागील जन्मातील अप्सरा, भोंदू खरातचे घटस्फोटीत महिलेसोबतही अश्लील कृत्य, आणखी एक कारनामा उघड
अशोक खरात
| Updated on: Mar 23, 2026 | 9:27 AM
Share

Ashok Kharat Crime : ज्योतिषी, भविष्यवेत्ता, अंकशास्त्रज्ञ असल्याचे सांगत, अनेकींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्याची यादी फारच मोठी असल्याचे दिसत आहे. महिलेवरील अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आणि खरातचे एकेक कारमाने बाहेर येऊ लागलेत. महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण करणारा अशोक खरात याच्याविरोधात आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने तदिलेल्या तक्रारीनुसार खरात हा तिला लग्नाचा आमिष दाखवत तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करायचा. तिच्या संसारात वाद सुरू होते, त्यावेळी ती खरातकडे मार्गदर्शनासाठी गेली होती, तेव्हाच त्याने परिस्थितीचा गैरफायदा घेत पीडितेचे शोषण केलं असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

महिलेला ओढलं जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, पीडत महिला ही विवाहीत होती, मात्र संसारात वाद सुरू होते, त्यामुळे त्याच दोषनिवारणासाठी ती खरातकडे गेली. वैयक्तिक अडचणींवर उपाय मिळावा यासाठी तिने खरातचं कार्यालय गाठलं. मात्र पीडितेच्या मनस्थितीचा, तिच्या परिस्थितीचा खआहेरातने गैरफायदा घेतला. “मी अवतारी पुरुष आहे, तू गेल्या जन्मीची अप्सरा, मला त्रिकाळ ज्ञान आहे”, असं भुलवत खरातने त्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं, तिच्याशी लगट करण्यास सुरूवात केली. भविष्याबाबत भीती दाखवत आणि मनात आशा जागवत त्याने त्या महिलेचं लैंगिक शोषण केलं, असा गंभीर आरोपही लावण्यात आला आहे.

पीडिता राहिली गर्भवती

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे खरातने केलेल्या लैंगिक शोषणानंतर पीडित महिला गर्भवती देखील झाली. त्यानंतर आपलं पितळ उघड पडू नये म्हणून ,तिचा गर्भपात करण्यासाठी खरातने तिला आपल्याच कार्यालयात बोलावलं आणि तिला औषधही दिलं. तू माझ्याशी लग्न कर,मी तुला व तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेन, असं सांगत, भुलवत खरात हा सतत त्या महिलेला फसवत राहिला, 2027 साली लग्न करू असं आश्वासनही त्याने पीडित महिलेला दिलं, असा आकोप तक्रारीत करण्यात आला आहे. भोंदू बाबाचे एकेक घृणास्पद कारनामे उघड होत असून त्याच्याविरोधत अख्ख्या राज्यात संतापाचं वातावरण आहे.

खरातला चालणंही मुश्किल

दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातवर जे आरोप आहेत, त्यांची  चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) केली जात आहे. काल चौकशीचा तिसरा दिवस होता, तर आदल्या दिवशी शनिवारी (21 मार्च) त्याची तब्बल सात तास चौकशी झाली. त्यावेळी एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या. या चौकशीत मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी, महिलांशी संबंधित आरोप याविषयी खरातला प्रश्न विचारण्यात आले.  काल पुन्हा एकदा खरातची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर मात्र तो पुरता हतबल झाला होता, त्याच्यात जराही त्राण नव्हते, त्याला धड चालताही येत नव्हतं.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?