AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने जैन व्यापाऱ्यांनाही सोडलं नाही, डोक्यात तिडीक जाणारं कृत्य; धक्कादायक माहितीने सर्वच हादरले

नाशिकमधील भोंदू अशोक खरातची अनेक काळी कृत्यं समोर आली आहेत. लैंगिक अत्याचार व कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तो सध्या पोलीस कोठडीत आहे. एसआयटी तपास करत असताना त्याने भविष्य व ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली शाकाहारी व जैन धर्मीयांना मासा 'पाण्यातली वनस्पती' असल्याचे सांगून खाण्यास भाग पाडले. ही धक्कादायक फसवणूक उघड झाली असून अधिक माहिती काढण्यासाठी तपास सुरू आहे.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने जैन व्यापाऱ्यांनाही सोडलं नाही, डोक्यात तिडीक जाणारं कृत्य; धक्कादायक माहितीने सर्वच हादरले
अशोक खरातची बंडलबाजी उघड
| Updated on: Apr 01, 2026 | 11:47 AM
Share

नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात हा अटकेत असून गेल्या अनेक दिवसांपासून SIT कडून त्याची चौकशी सुरू आहे. आज न्यायलयात हजर करण्यापूर्वी त्याला समोर बसवून अधिकाऱ्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले असून शेवटच्या काही तासांमध्ये अधिकाधिक माहिती काढण्यावर भर आहे.

दरम्यान भोंदू खरातची अनेक अश्लील, काळी कृत्यंही समोर येत असून त्याची नवी, हादरवणारी माहिती उघड होताना दिसत आहे. खरात हा भविष्य सांगण्याचा, ज्योतिष सांगण्याचा दावा करायचा आणि लोकंना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. आता याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून एका प्रकरणात तर त्याने हदद्च केल्याचे उघड झालं.

शाकाहारी, जैन धर्मीयांना फसवून लुबाडले लाखो रुपये

भोंदू खरातचे अनेक भक्त होते. त्यांना फसवण्यासाठी खरात हा डोकं लढवायात, वेगवेगळ्या युक्त्या करायचा. बंडलबाज खरातचे लोकांना ठगवण्याचे अनेक प्रकार आता समोर आले आहेत. मासा ही पाण्यातली वनस्पति असतो, असं सांगून खरा याने अनेक शाकाहारी लोकांना प्रसाद म्हणून मासा खाण्यास भाग पाडल्याचं उघड झालं आहे.

मासा कापला तर रक्त येत नाही, माश्यामध्ये हाडं नसतात, मास तर पाण्यातली वनस्पती, असं सांगून नराधम खरात याने काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवलं आणि त्यांच्याकडून लाखो रूपयांची रक्कम लुबाडल, अशा प्रकारेही त्याने बरीच संपत्ती जमवली, लोकांना लुबाजलं, अशी धक्कादायक माहिती आता तपासात उघड झाली आहे. एसआयटीचे अधिकारी या प्रकरणात कसून तपास करत आहेत, त्यांच्या तपासातच खरातची बंडलबाजी उघड झाली. यामुळे मोठी खळबळ माजली आहे

वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील होणार चौकशी ?

अनेकांना लुबाडणाऱ्या भोंदू अशोक खरातचे राजकीय नेत्यांची हितसंबंध होते, हे समारे आलेलं असतानाच, आता याप्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाडींचा शोध घेतला जाणार आहे. सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यात हजर होते अशी माहिती SIT कडे आहे. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई दिल्लीसह काही परदेशी पाहुणे ही खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते. भोंदू अशोक खरातच्या संबंधित असलेल्या नेत्यांच्या भोवती संशयाचं वातावरण असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील SIT कडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...