AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Scandal : भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात? शिंदेंच्या मंत्र्याच्या खास माणसाची SIT चौकशी, मोठा भांडाफोड होणार ?

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात सेक्स स्कँडलने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. अनेक नेते, मंत्री व सेलिब्रिटींशी त्याचे संबंध उघड झाले आहेत. रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता महायुतीतील मंत्र्यांच्या निकटवर्तीयांची SIT चौकशी सुरू झाली आहे. दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची चौकशी झाल्याने आणखी राजकीय नेते गोत्यात येण्याची शक्यता आहे. गुप्तता पाळून केलेली अटक आणि पेनड्राईव्हमधील माहिती यामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

Ashok Kharat Scandal : भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात? शिंदेंच्या मंत्र्याच्या खास माणसाची SIT चौकशी, मोठा भांडाफोड होणार ?
भोंदू बाबाप्रकरणी आता राजकीय नेते गोत्यात?
| Updated on: Mar 21, 2026 | 9:43 AM
Share

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या सेक्स स्कँडजलने (Ashok Kharat Scandal) अख्खा महाराष्ट्र हादरला असून त्याला अटक झाल्यापासून रोज नवनवे कुलासे होते आहेत, धक्कादायक माहितीदेखील समोर येत आहे. सर्वात धक्कादायक बााब म्हणजे राज्यातील अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटी हे बाबाचे भक्त होते, त्याच्या संप्रकार होते अशी माहितीदेखील उघड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, निलेश लंके, दीपक केसरकर यांचे, अशोक खरात सोबतचे काही फोटो समोर आल्याने मोठी खळबळ माजली. अटकेनंतर या भोंदू बाबाकडे मिळालेल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक व्हिडिओही सापडले. दिवसेंदिवस या प्रकरणाला गंभीर वळण मिळताना दिसत आहे.

आता राजकीय नेते गोत्यात?

दरम्यान या केसमध्येच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदू बाबा खरात याच्यासोबतचे फोटो समोर आल्याने रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात आणखी काही राजकीय नेते गोत्यात येण्याची शक्यता आहे. महायुतीतील सत्ताधारी, शिवसेने प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडडळातील मंत्र्यांच्या खास माणसाची , निकटवर्तीयाची SIT चौकशी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी झाली. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे हा SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला. SIT टीमने दीपक लोंढेची कसून चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक लोंढे हाँ सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भोंदू बाबा अशोक खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे यात आणखी किती, कोण लोक अडकणार, त्यात राजकीय नेते असणार का, काही मोठं भांडाफोड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ऑपरेशन कॅप्टन खरातवेळी पाळण्यात आली कमालीची गुप्तता

महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खरात याला अटक करण्यात आली. मात्र ऑपरेशन कॅप्टन खरात वेळी कमालीची गुप्तता पाळण्यात आली अशी माहिती आता उघड झाली आहे. कारण पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना देखील संपूर्ण माहिती दिलेली नव्हती . कॅप्टन खरातचे विविध राजकीय नेत्यांशी असलेले संबंध पाहता, त्याला अटक करताना गुप्तता पाळण्यात आली. कॅप्टन खरात हाँ देशाबाहेर पळून जाण्याची पोलिसांना भीती होती, त्यामुळे खबरदारीचे हे पाऊल उचलण्यात आलं. त्यानुसार, खरात याला त्याच्या राहत्या बंगल्यातून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

मिरगावमध्ये आज होणार ग्रामसभा

दरम्यान भोंदू अशोक खरात याने ज्या मिरगावमध्ये मंदिर उभे केले तिथे आज ग्रामसभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे काळे कारनामे उघड झाल्यावर ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खरात याने महिलांचे लैगिक शोषण केल्यानं मिरगाव चर्चेत आलं होतं. स्थानिक ग्रानस्थांमध्ये कॅप्टन खरातची मोठी दहशत असल्याचे समजते. त्यामुळे आज ग्रामसभेत काय चर्चा होते याकडे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!