AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : भोंदू कॅप्टन खरातचा पाय आणखी खोलात, धमकावण्यासाठी करायचा पिस्तुलाचा वापर ? छापेमारीत जे सापडलं…

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला लैंगिक शोषण, कोट्यवधींच्या खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनेक बड्या व्यक्तींना प्रभावित करणारा खरात आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडे सापडलेले पेनड्राइव्ह, पिस्तूल आणि २०० कोटींची मालमत्ता तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी SIT करत असून लवकरच मोठे खुलासे अपेक्षित आहेत.

Ashok Kharat : भोंदू कॅप्टन खरातचा पाय आणखी खोलात, धमकावण्यासाठी करायचा पिस्तुलाचा वापर ? छापेमारीत जे सापडलं...
Ashok Kharat
| Updated on: Mar 20, 2026 | 8:23 AM
Share

Ashok Kharat Case : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याचं नाव सध्या सगळीकडेच गाजतं आहे. अनेक राजकारणी, मोठ्या लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचे. मात्र त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पेनड्राइव्हमध्ये 58 च्या आसपास व्हिडीओ सापडले आहेत. एवढंच नव्हे तर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून घरात छापाही मारण्यात आला. त्यावेळी घरात पिस्तुल आणि जिवंत काडतुसं सापडल्यामुळे एकच खळबळ माजली.

धमकवण्यासाठी करायचा पिस्तुलाचा वापर ?

बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नुकताच मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊसवर छापा मारण्यात आला. त्यावेळी खरात याच्या घरातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसं ही पोलिसांनी जप्त केली. घरता पिस्तुल तसेच जिवंत काडतुसं सापडल्याने खळबळ माजली. मात्र आता याचसंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. भोंदू कॅप्टन खरात याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का ? तसेच त्याने पिस्तूल कोणाकडून, कसं, केव्हा, आणि कधी मिळवले याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या पिस्तूलाचा वापर तो धमकवण्यासाठी करायचा का असा देखील प्रश्न उपस्थित होत असून या सर्व अनुषंगाने पोलिस सविस्तर तपास करत ाहेत.

आणखी तीन गुन्हे दाखल

राज्य गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, अशोक खरात याच्याविरुद्ध नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास SIT आता एकत्रितपणे करेल. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे कॅप्टन अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढणार असून या प्रकरणात लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

करोडोंची संपत्ती

कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरातने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केली. नाशिक शहरात त्याचा आलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याचे समोर आले. एवढंच नव्हे तर सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याच्या नावे बरीच जमीन असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याची जवळपास 200 कोटींची संपत्ती असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!