AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ

अशोक खरात प्रकरण: SIT चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, त्याचे व्हिडीओ आणि राजकीय संबंधांचे आरोप यामुळे राज्य हादरले आहे. खरातने स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. यामागे मोठे लोक सामील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट... शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स... नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स... खरात प्रकरणात नवी एंट्री ? Image Credit source: social media
| Updated on: Apr 11, 2026 | 2:01 PM
Share

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खराने असंख्य महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केलं, त्याचे व्हिडीओही बनवले. मार्च 18 ला अटक झालेल्या अशोक खरातच्या SIT (विशेष तपास पथक) चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती दिवसेंदिवस समोर येत असून त्याने अख्खं राज्य हादरलं आहे. तुरूंगाच्या गजाआड असलेल्या खरातने श्रद्धेचा गैरवापर करत अनेकांना फसवलं, लुबाडलं, महिलांना ऑफीसमध्ये बोलावून, वर्षोनुवर्षे त्यांचं लैंगिक शोषण केला. हा सगळा प्रकार त्याच्या ऑफीसच्या सीसीटीव्हीमध्येही कैद व्हायचा. त्याच्या अश्लील कृत्यांचा आणि काळ्या कारनाम्यांचा रोज पर्दाफाश होत असून त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसही चक्रावलेत.

याच खरातने आता स्वतःबाबतच मोठी भविष्यवाणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्वत:चे भविष्य सांगताना “माझं मरण इथेच आहे” असे म्हटलं. पोलिस कोठडीत तो सुरक्षित नसल्याचा दावा आत्तापर्यंत अनेकांनी केला आहे, आता त्यालाही आपण इथून बाहरे पडू शकणार नसल्याचं वाटायला लागलंय असं खरातच्या या बोलण्यातून दिसतंय.

शिजूका नॉडी कोण ?

दरम्यान आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. भोंदू खरात प्रकरणात “शिजूका नॉडी ” या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स आले आहेत,असा दावा दमानिया यांनी केला आहे. भोंदू अशोक खरातने शिजूका नॉडी नाव ठेवून लोकांना मास्क केलंय. यामागे मोठे लोक आहेत , इनकमिंग आऊट गोइंग आहे असा दणदणीत आरोप दमानिया यांनी केला आहे. तसेच रुपाली चाकणकरांचे त्यावा 177 कॉल्स आहेत याचा पुनरुच्चार करतानाच त्यांना अद्याप समन्स नाही, चाकणकर यांनी त्याला एवढे कॉल का केले, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला.

खरातच्या जीवाला धोका

सध्याचं राजकारण विचित्र आहे. अशोक खरात याच्या जीवाला धोका आहे, त्याने हे कोठडीत असतानाच विधान केलंय. त्यामुळे आता आम्हाला अशी धास्ती वाटत्ये की, हे सगळं मिटवण्यासाठी त्याला संपवलं जाऊ शकतं, असं दमानिया म्हणाल्या. गोष्टी, बरीच माहिती बाहेर येऊ नये यासाठी खरातच्या जीवनाचं बरं वाईट होईल, असं म्हणत त्यामुळे खरातला प्रोटेक्शन द्यावं अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

अजित दादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक

दिवंगत नेते अजित पवार यांच्या घराबाहेर 18 नोव्हेंबरला ब्लॅक मॅजिकचा प्रकार समोर आला होता, त्यावर मी सध्या लक्ष केंद्रीत केलं आहे, असं दमानिया म्हणाल्या. खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांचा रोल काय त्याची माहिती घेत असल्याचंही दमानिया यांनी सांगितलं आहे.

Follow Us
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल