AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा…; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ, सगळंच सांगून टाकलं

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवीच्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा...; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ, सगळंच सांगून टाकलं
Ashok KharatImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 6:56 PM
Share

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 100 व्हिडीओ सापडले आहेत. दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात आहे. अजितदादा यांच्या घरासमोर कथाकथीत जादूटोणा केला गेला होता, यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे रुपाली पाटील यांनी देखील या प्रकरणाशी खरातचं कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले माने?

खात्रीने सांगता येईल की, या संदर्भात दादांच्यावर काहीतरी कथाकथीत संमोहन मोहिनी, काळी जादू असं काहीतरी हा माणूस अशोक खरात करायचा. या बोगस माणसाने राजकीय नेते आपल्या हाताशी धरून या सर्व गोष्टी केल्या. दादांवर मोहिणी टाकून आपल्याला सत्ता पाहिजे, अशा स्वरुपाच्या काही गोष्टी करणारे लोक होते. दादांना प्रभावीत करण्यासाठी अशा काही गोष्टी करण्यात आल्या अशी आमची माहिती आहे. दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर जो उतारा पहायला मिळाला होता, तो कॅप्टन खरातनेच केला आहे का? असा प्रश्नही यावेळी माने यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, आम्हाला जी काही माहिती मिळते त्यावरून तो माणूस यामध्ये सहभागी आहे, असं आमच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी असं माने यांनी म्हटलं आहे.

खरातची संपत्ती किती?

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी त्याने प्लॉटस खरेदी केली आहे. त्याच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची एकूण किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर देखील संपत्ती असल्याचे समोर आलं आहे, त्यामुळे आता या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान