भोंदू खरातचा सर्वात भयानक कांड समोर, बनावट अधिकारी पाठवून…आपल्याच भक्तांना अडकवायचा जाळ्यात!

भोंदू अशोक खरात याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो आपल्याच भक्तांविरोधात सापळा रचून त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. बनावट प्राप्तिकर अधिकारी आपल्या भक्तांच्या घरी पाठवायचा.

भोंदू खरातचा सर्वात भयानक कांड समोर, बनावट अधिकारी पाठवून...आपल्याच भक्तांना अडकवायचा जाळ्यात!
ashok kharat
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2026 | 7:48 PM

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याने जादू, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या खरातचे एक-एक प्रकरण समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकरणात त्याच्याविरोधात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या या सर्व कृत्यांची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केली जात आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासह त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. त्याच्याकडे 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात असतानाच आता याच भोंदू खरताचा आणखी एक धक्कादायक कांड समोर आला आहे. तो आपल्याच भक्तांच्या मागे बोगस प्राप्तिकर अधिकारी लावून त्यांना लुबाडायचा, अशी मोठी माहिती समोर आली आहे.

नेमका काय कारनामा समोर आला?

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तो बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून आपल्याच भक्तांकडून पैसे उकळायचा. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजक हेरून तो त्यांच्याकडे नकली प्राप्तिकर विभागाचे नकली अधिकारी पाठवायचा. संबंधित भक्त मोठ्या अडचणीत सापडला आहे, असे भासवले जायचे. त्यानंतर तडजोडीच्या नावाखाली तो भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा. अशा अनेक भक्त असलेल्या उद्योजकांची त्याने फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता हे भक्त गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पतसंस्थेत एकूण 132 बँक खाते

दुसरीकडे अशोक खरातच्या शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याचे समता आणि जगदंब पतसंस्थेत एकूण 132 खाते असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 33 जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीत 33 जणांच्या नावावर एकूण 60 बँक खाती आढळली आहेत. 2024 सालापासून 44 खात्यांवर व्यवहार बंद आहे. यातील काही खाते हे नातेवाईकांच्या नावावर आहेत. यात दोन परिवहन अधिकाऱ्यांच्या खात्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, भक्तांनाच लुबाडण्याचे त्याचे नवे प्रकरण समोर आल्यानंतर भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us