
मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईत बसून सर्व प्रश्न सोडवायचे. आता त्यांचे नाव घेणारे मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला जातात. सलमान फाळके याच्याबरोबर फोटो असल्याचे आरोप केले. कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. पण, माझ्यावर आरोप किंवा मला चौकशीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १ ने बोलवाचे. यावर बाकीच्यांनी बोलू नये. ड्रग माफियाला पळवून लावण्यात डीसीएम वन गॅंग व्यस्त आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बेस्ट कामगारांच्या प्रश्नाबाबत सुप्रिया सुळे यांनी आणिक आगार येथे भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बेस्ट कामगारांना खोके सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. मात्र त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. याबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांची बेस्ट कामगारांच्या प्रश्न संदर्भात लवकरच भेट घेणार आहे. त्यांच्यासमोर हे सगळे प्रश्न मांडणार आहे. बेस्टविषयी श्वेतपत्रिका काढली पाहिजे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा ट्रिपल इंजन खोके सरकारने त्यांना आश्वासन दिले होते. त्यांचे प्रश्न सोडवले नाही. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काय करावं? हे जुमले बाज सरकार आहे असे त्या म्हणाल्या.
खोके सरकारमध्ये मुंबईकर भरडला जात आहे. डोंबल्याचे सरकार आपल्या दारी? पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये कार्यक्रम घेतल्यानंतर सरकार आपल्या दारी होतं का? एका दिवसाचा मंडपाचा, या कार्यक्रमाचा खर्च एक कोटी आहे. जेजुरीत चार वेळा कार्यक्रम रद्द झाला. पंधरा ते वीस कोटींचा चुराडा झाला. पंधरा कोटी अशा लोकांना दिले असते तर त्यांच्या घरात दिवाळी झाली असते. ट्रिपल इंजिन सरकारला मस्ती आली आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
भाजपा महाराष्ट्रात आरक्षणाबाबत एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देवू अस देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन बोलले होते आता 200 कॅबिनेट झाल्या असतील. धनगरांच्या आरक्षणाला भाजपच्याच खासदारांनी दिल्लीत विरोध केला. मराठा लिंगायत मुस्लिम समाजालाही भाजपने असेच फसवलं आहे भाजप उघडी पडली आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजितदादांना दिल्लीला घेऊन का जात नाही? जॅकेट घालून त्यांची टीम फिरते. त्या डीसीएम वन ला हे विचारा. हे सरकार फक्त घरफोड, ईडी कारवाई कर हेच करत आहे. सदावर्ते यांच्या गाडीवरील हल्ला असेल किंवा इतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील. गृहमंत्रालय आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णतः अपयशी झाले आहेत अशी जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी केली.