Pune | अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला, स्थानिक नागरिक भडकले
अतिक्रमणाविरोधात (encroachment) कारवाई करत असताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pmc Officer) बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारवाईवेळी स्थानिक नागरिक भडकले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण (Viral Video) केली.
अतिक्रमणाविरोधात (encroachment) कारवाई करत असताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pmc Officer) बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती, यावेळी हा प्रकार घडलाय. या कारवाईवेळी स्थानिक नागरिक चांगलेच भडकले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण (Viral Video) केली. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नंतर सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. मात्र या धक्कादायक प्रकाराने पालिका प्रशासन हादरून गेले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. अतिक्रमण हटवताना असे प्रकार घडत असल्याने अतिक्रमण हटवणे पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान बनलं आहे. गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

