AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | इतिहासापासून पळून जावं हे कितपत योग्य आहे? औरंगजेबाची कबर बंद करण्यावर विश्वंभर चौधरींचा सवाल

पुरातत्त्व खात्याने पुढील पाच दिवस औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. यावर समाजवादी विचारसरणीच्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Aurangabad | इतिहासापासून पळून जावं हे कितपत योग्य आहे? औरंगजेबाची कबर बंद करण्यावर विश्वंभर चौधरींचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 6:09 PM
Share

औरंगाबादः अशांतता होते म्हणून पुतळे, समाध्या बंद करायच्या असतील तर तुम्हाला या देशातल्या महापुरुषांचे पुतळे आणि समाध्या बंद कराव्या लागणार आहेत का? इतिहासापासून शिकावं, समजूतदार व्हावं हे ठीक पण इतिहासापासून पळून जावं हे कितपत योग्य आहे? आणि त्यात शहाणपण ते काय? असा जळजळीत सवाल राजकीय विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी अकबरुद्दीन औवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्यासोबत औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीचं (Aurangzeb Tomb) दर्शन घेतलं आणि राज्यभरातील हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. काहींनी तर ही कबर उखडून टाकण्याची भाषा केली. यामुळे खुलताबाद येथील कबरीला धोका निर्माण झाल्याची भावना स्थानिकांमध्ये बळावली. परिणाम आज 19 मे रोजी भारतीय पुरातत्त्व विभागानं औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात पर्यटक अथवा सामान्य नागरिकांना ही कबर पहायला जाता येणार नाही. मात्र एखाद्या गोष्टीवरून वादंग होत असेल तर तिला सुरक्षा देणारी यंत्रणा वाढवण्याऐवजी अशा प्रकारे तिच्यावर थेट पडदा टाकणं संतापजनक असल्याची प्रतिक्रिया एका वर्गातून उमटत आहे.

औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद

संभाजीराजेंची हत्या करणारा, सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा क्रूर पद्धतीने खून करणाऱ्या औरंगजेबाची कबर ठेवायचीच कशाला, अशी भूमिका गेल्या काही दिवसात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्यामुळे या कबरीवर कधीही हल्ला होऊ शकतो, अशी भीती कबर समितीतील लोकांना वाटू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिकांनी स्वतःच निर्णय घेत येथील कबर बंद केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ती पुन्हा पर्यटकांसाठी खुली केली. मात्र कबरीचं संरक्षण करण्यासाठी काही दिवस ती बंदच ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने पुढील पाच दिवस औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. यावर समाजवादी विचारसरणीच्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विश्वंभर चौधरींची पोस्ट काय?

राजकीय विश्लेषक आणि समाजवादी विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘भारतीय पुरातत्त्व विभागाचा हा निर्णय चमत्कारीक आहे. औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, पण आयुष्याची 27 वर्ष त्यानं मराठी देशी काढली. हा इतिहास महत्त्वाचा नाही का? औरंगजेबाची कबर सरकार संरक्षित करू शकत नसेल तर हे केंद्र सरकार फारच दुर्बल आहे, असं म्हणलं पाहिजे. किंवा स्वतःला आवडत नसलेला इतिहास मारण्याची कावेबाजी असं म्हणलं पाहिजे. आणि पुरातत्त्व विभाग काय काय बंद करणार, हाही विषय आहेत… पूर्ण पोस्ट पुढील प्रमाणे-

‘कबर बंद’ वरूनही श्रेयवाद

दरम्यान, औरंगजेबाची कबर पुरातत्त्व विभागानं काही दिवसांकरिता बंद केल्यानंतरही राजकीय पक्षांनी श्रेयवादासाठी लढाई सुरु केली आहे. आम्ही इशारा दिला, आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर बंद करावी लागली, अशा प्रतिक्रिया हिंदुत्ववादी पक्षांकडून येत आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.