Aurangabad | यांनाही गुवाहटीची प्रेरणा.. प्रयोग समाजासाठी आदर्श, वेस्ट प्लास्टिक बाटल्यांपासून साकारलं इको फ्रेंडली घर!

इको हाऊस उभारणीसाठी नमिता आणि कल्याणीला जवळपास सहा ते सात लाख रुपये खऱ्च आला. नव्या संकल्पनेतून साकरलेले हे ङर किमान दहा वर्षे टिकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad | यांनाही गुवाहटीची प्रेरणा.. प्रयोग समाजासाठी आदर्श, वेस्ट प्लास्टिक बाटल्यांपासून साकारलं इको फ्रेंडली घर!
औरंगाबादेत साकारलेल्या 'वावर' प्रक्लापचे उद्घाटन करताना आदित्य ठाकरेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:31 PM

औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांनी आठवडाभर गुवाहटीत मुक्काम ठोकल्यानंतर तेथील झाडी, डोंगरांची चर्चा चांगलीच गाजली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला गुवाहटीची (Guwahati) जणू भुरळ पडलीय. पण याच गुवाहटीतील पामोही गावातील अक्षर स्कूलने राबवलेल्या एका उपक्रमातून औरंगाबादच्या मुलींनी (Aurangabad young girls) फार पूर्वीच प्रेरणा घेतली. या शाळेच्या इकोब्रिक संकल्पनेद्वारे शहरातील दोन तरुणींनी इको फ्रेंडली हाऊस बांधले आहे. दौलताबाद ते शरणापूर फाटा या रस्त्यावर दोन तरुणींनी हे घर साकरले असून कोरोना काळापासून या दोघी या प्रकल्पावर मेहनत घेत आहे. विशेष म्हणजे हे घर बांधण्यासाठी सिमेंटचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे नुकतेच औरंगाबादेत आले होते. त्यांनी या घराला भेट दिली.

कशी सूचली कल्पना?

औरंगाबादमधील नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन्ही तरुणी शासकीय फाइन आर्ट्स महाविद्यालयात एम.एफ. ए. चं शिक्षण घेत आहेत. या दोन्ही मैत्रिणींना समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी कल्पना सत्यात साकारयची होती. याच शोधात त्यांनी गुवाहटी येथील अक्षर शाळेचा व्हिडिओ पाहिला. यात इकोफ्रेंडली हाऊसची कल्पना होती. पामोही गावातील पर्मिना-मेझीन या दाम्पत्याची अक्षर स्कूल आहे. यात त्यांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांच्या रचनेत सिमेंट भरून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा केल्या आहेत. मात्र नमिता आणि कल्याणी या दोघींनी इको फ्रेंडली घरासाठी सिमेंट ऐवजी मातीचा वापर करण्याचं ठरवलं.

असा साकारला प्रकल्प

या दोन्ही तरुणींनी 2021 पासूनच या घरासाठी रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. सुरुवातील यासाठी घरातून खूप विरोध झाला. मात्र काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं, म्हणून घरातून खूप जिद्दीने पाठिंबा मिळवल्याचं तरुणींनी सांगितलं. या प्रयत्नात त्यांनी 16 हजार बाटल्या जमा केल्या. सुरुवातीला त्यांनी माती, नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा कचरा आणि बांबूच्या सहय्याने इको ब्रिक तयार केल्या. १० हजार बाटल्यांमध्ये प्लास्टिक भरले. उर्वरीत ६ हजार बाटम्यांमध्ये माती भरली. या बाटल्यांची गुणवत्ता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तपासली. त्यानंतर जुलै 2021 मध्ये एक भिंत उभी करून ट्रायल घेतली.

सहा ते सात लाख रुपये खर्च

इको हाऊस उभारणीसाठी नमिता आणि कल्याणीला जवळपास सहा ते सात लाख रुपये खऱ्च आला. नव्या संकल्पनेतून साकरलेले हे ङर किमान दहा वर्षे टिकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.