AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV VIDEO | औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट

पोलिसांच्या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. (Aurangabad Salon businessman police beats CCTV)

CCTV VIDEO | औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट
पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज
| Updated on: Apr 15, 2021 | 8:37 AM
Share

औरंगाबाद : पोलिसांच्या मारहाणीत औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र आता या घटनेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats CCTV footage creates twist).

नियम मोडून सलून उघडल्याचा दावा

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकानं उघडण्यास मुभा आहे. मात्र या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेतील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.

फिरोज खान यांना मारहाण केल्याचा आरोप

सलून उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. पोलिसांनी खान यांना बेदम मारहाण केल्याचा दावा केला जात होता. या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे.

पाहा व्हिडीओ :

(Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats CCTV footage creates twist)

पोलीस ठाण्याबाहेर मृतकांच्या नातेवाईकांचा ठिय्या

सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले होते. सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर ते दाखल झाले होते. तिथे त्यांनी सलून व्यवसायिकाची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी केली होती. मृताचे नातेवाईक आणि उस्मानपुरा परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.

संबंधित पोलिसांची तडकाफडकी बदली

या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली केली आहे.

संबंधित बातम्या 

कडक निर्बंध असताना सलून उघडलं, पोलिसांनी इतकं मारलं की जीव गेला, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

(Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats CCTV footage creates twist)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.