औरंगाबादेत आजपासून दोन खासगी हॉस्पिटलमध्ये बूस्टर डोस, 18 वर्षांपुढील नागगरिकांसाठी अतिरिक्त सुविधा

| Updated on: Jun 18, 2022 | 11:07 AM

शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 10 रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 39 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 32 घरीच उपचार घेत आहेत.

औरंगाबादेत आजपासून दोन खासगी हॉस्पिटलमध्ये बूस्टर डोस, 18 वर्षांपुढील नागगरिकांसाठी अतिरिक्त सुविधा
Image Credit source:
Follow us on

औरंगाबादः राज्यभरातील कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची संख्या नव्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तेवढी खबरदारी घेणं गरजेचं आहे. औरंगाबादमध्ये शनिवारपासून कोरोनाचा बूस्टर डोस अर्थात प्रीकॉशन लसीकरणाला (Vaccination) खासगी रुग्णालयातही (Private hospital) सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील प्रत्येकाला ही लस घेता येणार आहे. तर, मनपा आणि शासकीय रुग्णालयात बूस्टर डोससाठी 60 वर्षांचं बंधन आहे. सर्वत्र मुबलक प्रमाणात लसीचें डोस उपलब्ध आहे. नागरिकांवी वेळेवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहान महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

कुठे कुठे मिळेल बूस्टर डोस?

कोविशील्डचा बूस्टर डोस शनिवारपासूव दुपारी 3 ते 5 या वेळेत धूत हॉस्पिटलमध्ये दिला जाईल. तसेच मेडिकोव्हर रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. धूत हॉस्पिटलमध्ये 380 रुपयांना ही लस मिळेल. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी डॉ. हेडगेवर, डॉ. कमलनयन बजाज, युनायटेड सिग्मा आणि एमजीएम रुग्णालयाला पत्र देऊन लसीकरण सुरु करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. तसेच शहरातील सर्वच सेंटरवर लस उपलब्ध आहे. कुठेही लसीचा तुटवडा नाही. सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याने लसीकरणामुळे नागरिकांना सुरक्षा मिळेल. कोविड झाल्यानंतर उपचार किंवा धावपळ करण्यापेक्षा लस घेऊन सुरक्षित राहणे योग्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.

कोरोनाचं प्रमाण किती?

शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 10 रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 39 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 32 घरीच उपचार घेत आहेत.
औरंगाबादच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 20 लाख 20 हजार 230 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 15 लाख 36 हजार 952 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरातील 9 लाख 77 हजार 195 जणांनी पहिला डोस तर 7 लाख 50 हजार 401 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर एकूण जिल्हाभरात आतापर्यंत 81200 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.

हे सुद्धा वाचा