AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विषप्राशन केलेले दीर-भावजय, भर रस्त्यात घट्ट मिठी, जालना रोडवर अखेर तडफडत कोसळले, औरंगाबादेत काय घडलं?

सदर युगुल करमाड येथील रोडवर आल्यानंतर त्यांना विषप्राशन केल्यामुळे झटके येत होते. उलट्यांचा त्रासही होऊ लागला. त्यामुळे परिसरात विषारी दर्पही पसरला होता.

विषप्राशन केलेले दीर-भावजय, भर रस्त्यात घट्ट मिठी, जालना रोडवर अखेर तडफडत कोसळले, औरंगाबादेत काय घडलं?
मयत पुरुष काकासाबेब आणि महिला सत्यभामा
| Updated on: Feb 12, 2022 | 9:35 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील जालना रोडवर करमाड (Karmad) परिसरात एक धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. ऐन सायंकाळी पाच वाजण्याची वेळ होती. करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिल्डिंगसमोर विष प्राशन केलेले एक प्रेमी जोडपे आले. चालताना दोघांचेही झोक जात होते. विष प्राशन केल्याने  (Suicide case)चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही क्षणांत खाली कोसळले. हात-पाय तडफडत होते. दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. एकदम कोसळल्याने दोघांचेही मोबाइल बाजूलाच पडलेले. परिसरातील नागरिकांनी या दोघांची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना (Aurangabad police) आणि  रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित केलं. जमलेल्या नागरिकांनी सांगितलेली ही आपबिती अतिशय धक्कादायक आहे.

कोण होते दोघे?

करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडलेल्या या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तसेच त्यांचे मोबाइलही पोलिसांच्या हाती सोपवले. त्यावरून पुढील माहिती काढण्यात आली. हे दोघे दीर-भावजय असल्यांचं पोलिसांनी सांगितलं. करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वीच सदर महिला सत्यभामा कदम ही तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. सत्यभामा कदम ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या. दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला. तेव्हापासून सत्यभामा यांचा पोलीस शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वाहनचालक आणि गृहिणी

या घटनेतील तरुण काकासाहेब कदम हे शेती करून मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर सत्यभामा कदम या गृहिणी होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले असा परिवार होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल हे सदर घटनेचा पुढील तपास करीत आहे.

विष प्राशन व उलट्यांनी परिसरात दर्प

सदर युगुल करमाड येथील रोडवर आल्यानंतर त्यांना विषप्राशन केल्यामुळे झटके येत होते. उलट्यांचा त्रासही होऊ लागला. त्यामुळे परिसरात विषारी दर्पही पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंह जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. शेख अनिस हे तत्काळ 108 ची रुग्णवाहिका घेऊ घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही तत्काळ चिकलठाणा येथील मिनी घाटीत नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

इतर बातम्या-

नो-मेकअप लूकमध्येही Monalisa चा कातिलाना अंदाज, फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील फोटो व्हायरल

12 February 2022 Panchang | 12 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या शनिवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.