Aurangabad | महापालिकेत हंगामा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेड्या,  कोणती कलमं लावली?

Aurangabad | महापालिकेत हंगामा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेड्या,  कोणती कलमं लावली?
Image Credit source: tv9 marathi

मनपाचे सुरक्षारक्षक शेकनाथ किसन तांदळे यांनी इंगळेंसह त्याचा साथीदार योगेश हरिश्चंद्र मगरेविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 14, 2022 | 10:00 AM

औरंगाबादः पाणीटंचाईचा (water scarcity) प्रश्न घेऊन महापालिका आयुक्तांना (Municipal commissioner) घेरण्याचा आणि त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना हे प्रकरण चांगलंच भोवलं. शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्तांवर धावून जाणाऱ्या तरुणांविरोधात सर्व महापालिका कर्मचारी एकवटले. या घटनेच्या निषेधार्थ मनपाच्या सुमारे 3500 कर्मचाऱ्यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काम बंद आंदोलन केलं. सायंकाळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री उशीरा राहुल इंगळे (Rahul Ingle) यास पोलिसांनी अटक केली. त्यामुळे महापालिकेत दुपारच्या वेळेला आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना घेरण्याचा प्रयत्न या दोघांना चांगलाच महागात पडणार असं दिसतंय.

काय घडलं शुक्रवारी दुपारी?

शुक्रावारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय कार्यालयीन कामकाज आटोपून जेवणासाठी बाहेर पडत होते. त्यावेळेला राहुल इंगळे आणि त्याचा साथीदार योगेश हरिशचंद्र मगरे यांनी कागदी फलक घेऊन आयुक्तांना गाठले. एवढ्यात यापैकी एकाने घटनेचं चित्रीकरण सुरु केलं. ही स्टंटबाजी पाहून आयुक्त चांगलेच भडकले. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत दोन तरुणांना समज दिली. तरीही ते आयुक्तांना जाऊन भिडले, असा आरोप आयुक्तांनी केला आहे. या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

प्रशासकांवर हल्ला झाल्याची बातमी पसरल्यावर काही मिनिटातच मनपा मुख्यालय, वॉर्ड कार्या कार्यालयातील 3500 कर्मचाऱ्यांनी हातातील कामे बाजूला ठेवून काम बंद आंदोलन सुरु केलं. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. इंगळे मगरेंवर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांकडे दिले.

हे सुद्धा वाचा

गोंधळ घालणाऱ्यांवर कोणती कलमं?

मनपाचे सुरक्षारक्षक शेकनाथ किसन तांदळे यांनी इंगळेंसह त्याचा साथीदार योगेश हरिश्चंद्र मगरेविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम 341 (रस्ता अडवणे), कलम 353 (सरकारी कामात अडथळा), कलम 34 आणि ३ (विना परवानगी कार्यालयात छायाचित्रण करणे) या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें