Aurangabad : औरंगाबादमध्ये बॉम्बच्या अफवेने ‘बॉम्बाबोंब’! शोध घेतल्यावर कळलं, अरे ही तर पॉवर बँक

Aurangabad Bomb News : बॉम्बशोधक पथकाला याबाबत कळवण्यात आलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.

Aurangabad : औरंगाबादमध्ये बॉम्बच्या अफवेने 'बॉम्बाबोंब'! शोध घेतल्यावर कळलं, अरे ही तर पॉवर बँक
औरंगाबादेत खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 12:21 PM

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याआधी एक खळबळजनक घटना औरंगादमधून समोर आली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad Bomb News) बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, शोध घेतला असता बॉम्ब सदृश्य वस्तू एक पॉवर बँक असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र हे कळेपर्यंत सगळ्यांनाच घाम फुटला होता. औरंगाबादच्या सरस्वती भूवन महाविद्यालय (Aurangabad Collage) परिसरात बॉम्ब आढळ्याची अफवा पसरली होती. बॉम्बशोधक पथकाला याबाबत कळवण्यात आलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. बॉम्बची अफवा पसरल्यानं संपूर्ण औरंगाबादमध्ये (Aurangabad News) दहशत पसरली होती. अखेर बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. बॉम्ब सदृश्य वस्तू ही पॉवर बँक असल्याची माहिती तपासणीअंती देण्यात आली. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

कधीची घटना?

औरंगाबाद महाविद्यालय परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू असल्यावरुन शंका घेतली गेली होती. दरम्यान, बॉम्ब असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत याबाबतची माहिती बॉम्ब शोधक पथकाला दिली. बॉम्ब शोधक पथकानं पाहणी केली असता, बॉम्ब शोधक पथकांनी ही वस्तू पॉवर बँक असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलीस यंत्रणा संतर्क

येत्या 8 जूनला मुख्ममंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादेत होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर बॉम्बच्या अफवेमुळे आता पोलीसही सतर्क झालेत. पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली असून आता औरंगाबादच्या बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्यातही अफवा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद प्रमाणेच ठाणे महापालिकेतही बॉम्बची अफवा पसरली होती. ठाणे महापालिकेच्या गेटवर एक बेवारस बँग आढळून आल्यानं सगळेच धास्तावले होते. अखेर ही बॅग एका डिलिव्हरी देणाऱ्याची असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाला तैनात करुन या बँगची तपासणी करण्यात आली होती. ही बॅग कुणाची आहे, हे कळेपर्यंत ठाण्यातही खळबळ माजील होती. त्यानंतर आता औरंगाबादेतही अशीच घटना समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.